विशेष प्रतिनिधी
पुणे : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांची एक भावनिक व्हॉट्सॲप स्टेटस पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे.Jay Pawar
जय पवार यांनी आपल्या स्टेटसला वडिलांसोबतचे दोन फोटो ठेवले आहेत. त्या फोटोंसोबत त्यांनी लिहिलेला मजकूर अनेकांच्या मनाला भिडत आहे. तुमची खूप आठवण येतेय. डॅड, काश वेळ थांबली असती. मी तुम्हाला घट्ट मिठीत घेऊन आयुष्यभर तसाच राहिलो असतो. मिसिंग यू अ लॉट डॅड! असे शब्द जय पवार यांनी लिहिले आहेत. या स्टेटसचा स्क्रीनशॉट विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून, अनेकांनी त्यावर भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. Jay Pawar
अजित पवार हे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामती येथे येत असताना 28 जानेवारी रोजी त्यांच्या विमानाचा अपघात झाला होता. धावपट्टीवर उतरताना विमान कोसळले आणि त्यानंतर झालेल्या स्फोटात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेने राज्यभरात शोककळा पसरली आणि राजकीय वर्तुळात मोठा धक्का बसला.
29 जानेवारी रोजी बारामतीतील विद्या प्रतिष्ठान मैदानावर अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बारामतीत मोठी गर्दी उसळली होती. विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिकांनी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली. या अंत्यसंस्काराच्या वेळी भावनिक वातावरण निर्माण झाले होते. Jay Pawar
सुनेत्रा पवार मंगळवारी काटेवाडी येथे असणार आहेत. काटेवाडीतील ‘सहयोग’ या निवासस्थानी पवार कुटुंब दुपारी चार वाजेपर्यंत सांत्वनपर भेटी स्वीकारणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या काळात अनेक नागरिक, कार्यकर्ते आणि नेते पवार कुटुंबीयांची भेट घेत शोक व्यक्त करत आहेत. जय पवार यांच्या स्टेटसमधून मुलाची वडिलांविषयीची ओढ आणि दु:ख स्पष्टपणे दिसून येत आहे.
Dad, I Wish Time Had Stopped”: Ajit Pawar’s Son Jay Pawar’s Emotional WhatsApp Status
महत्वाच्या बातम्या
- भाजपसाेबत जाणार नाही.. नाही म्हणजे नाही, राज ठाकरे यांनी केले वृत्ताचे खंडन
- Sharad Pawar :विलीनीकरणाच्या चर्चेत जे उपस्थित नव्हते, त्यांना बैठकीबद्दल काय माहिती, शरद पवार यांचा सवाल
- Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार; पुण्यातील पाच आरोपींनी दिली कबुली
- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी प्रितीसंगमावर केले स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन