विशेष प्रतिनिधी
नाशिक : Trimbakeshwar नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी आलेल्या काही पत्रकारांना गुंडाच्या टोळक्याकडून मारहाण करण्यात आली आहे, या मारहाणीमध्ये तीन ते चार पत्रकार जखमी झाले आहेत.Trimbakeshwar
त्र्यंबकेश्वर येथील स्वामी समर्थ केंद्राच्या परिसरामध्ये ही घटना घडली आहे. इथे काही गुंड अवैध पद्धतीनं गाड्यांच्या प्रवेशासाठी पावती देऊन पैशांची वसुली करत होते, त्याच दरम्यान हा प्रकार घडला आहे. या घटनेत पत्रकार किरण ताजणे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.Trimbakeshwar
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या घटनेनंतर पत्रकार संघटनांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला असून, घटनेचा निषेध करण्यात आला आहे, या प्रकरणातील आरोपींवर लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी मागणी पत्रकारांनी केली आहे.Trimbakeshwar
मंत्री छगन भुजबळ यांनी या घटनेत जखमी झालेल्या पत्रकारांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी केली आहे, भुजबळांकडून या घटनेचा निषेध करण्यात आला असून, या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे असे ते म्हणाले.
पत्रकारांना मारहाण करणं हे गैर आहे, या घटनेचा मी निषेध करतो, याप्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे, त्यांनी या प्रकरणी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्याशी फोनवरून संवाद साधला, पत्रकारांना मारहाण करणाऱ्या आरोपींना तातडीनं अटक करा, त्यांच्यावर कठोर कारवाई करा असे आदेश एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले आहेत.
Journalists beaten up by a gang of goons in Trimbakeshwar, four injured
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!