विशेष प्रतिनिधी
पुणे : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासमोर राज्य सरकार पूर्णपणे झुकले असून त्यांच्या बेकायदेशीर मागण्या मान्य केल्या जात आहेत. या लोकनियुक्त सरकारने महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणाचा गळा घोटला आहे, असा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला.
हाके म्हणाले की, राज्यातील लोकसंख्येचा विचार करता ओबीसी समाजाला अर्थसंकल्पात 50 टक्के निधी मिळणे अपेक्षित होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींच्या तोंडाला पाने पुसत 1 टक्क्यापेक्षाही कमी निधी दिला. सरकारने केवळ निवडणुकी डोळ्यासमोर ठेवून घाईघाईने अनेक महामंडळांची घोषणा केली. पण आज या महामंडळांना ना निधी मिळाला आहे, ना हक्काचा सचिव. हा केवळ निवडणुकीचा जुमला होता का?
लक्ष्मण हाके म्हणाले की, आम्ही यापूर्वीच राजेश टोपे यांना थेट आव्हान दिले होते. मात्र आज त्यांना स्वतःच्या मतदारसंघात एक सरपंचही निवडून आणता आलेला नाही. इंग्रजांनी सातसमुद्रापारून येऊन या देशात जातनिहाय जनगणना करण्याची हिंमत दाखवली, पण स्वातंत्र्यानंतरच्या राज्यकर्त्यांना ती करता आली नाही. अचूक इम्पिरिकल डेटा नसल्यामुळे ओबीसी समाजाची खरी संख्या समोर येत नाही. त्यामुळे ओबीसींच्या हक्काचा निधी आणि प्रतिनिधित्व डावलले जात आहे. राज्य सरकारने तातडीने जातनिहाय जनगणना करून ओबीसी समाजाला न्याय द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
प्रसाद लाड नावाचा आमदार म्हणतो की ‘हत्ती अख्खा गेला आणि आता फक्त शेपूट राहिले आहे. लाड यांनी आधी आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि मग बोलावे. हॉटेलवाले, झाडूपोच्छा करणारी टीनपाठ माणसे जरांगेचे उंबरठे झिजवत आहेत. लाड यांच्यासारख्या नेत्याला जरांगेंकडे पाठवून सरकारने स्वतःचाच ‘सेल्फ गोल’ केला आहे. माझी पात्रता विचारणाऱ्या लाड यांनी आधी सांगावे की मनोज जरांगे कुठल्या सभागृहाचे लोकप्रतिनिधी आहेत? असा सवाल त्यांनी केला.
लक्ष्मण हाके यांनी यावेळी पवार कुटुंबावरही जोरदार टीका केली. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ‘पवार प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनी करून टाकली आहे, असा आरोप त्यांनी केला. तसेच शरद पवार यांनी कर्मवीर भाऊराव पाटील संस्थेच्या घटनेत सोयीस्कर बदल करून स्वतः अध्यक्षपद पटकावले आणि रोहित पवार यांना उत्तर विभागाचे अध्यक्ष केले, अशी टीकाही त्यांनी केली.
भाजप सध्या ‘जेन झी’ पिढीला आणि ‘कॉकरोज जनता पार्टी’ला प्रचंड घाबरली आहे, असा दावा करत त्यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांवरही निशाणा साधला.
Laxman Hake alleges Maharashtra govt surrendered to Manoj Jarange Patil, strangled OBC reservation
महत्वाच्या बातम्या
- High Court : जनावरांच्या कत्तल निर्बंधांवर स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार
- Rohit Pawar : “भाजपसोबत जाणार नाही”; रोहित पवारांच्या विधानाने राष्ट्रवादीत नव्या चर्चांना उधाण
- ‘नीट’चा पेपर कसा फोडला, ते ही पुरावा न सोडता; चौकशीसाठी पोलिसांनी गाठलं मांढरेंचं कॉलेज! तपासात काय सापडलं पाहा!
- शेतकऱ्यांना कर्जवाटप वाढवा, सीबीलमुळे कुणालाही रोखू नका; मुख्यमंत्री फडणवीसांचे बँकांना निर्देश