विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. भारतात एकाच टप्प्यात निवडणूक होणार असून 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल. maharashtra vidhansabha election
केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर कार्यक्रम आज (दि. 15) जाहीर केला आहे. कार्यक्रमानुसार महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणुका पार पडणार आहेत. तर, मतमोजणी होऊन निकाल 23 नोव्हेंबरला घोषित केले जाणार आहेत.
महाराष्ट्रासह निवडणूक आयोगाने झारखंडमध्ये होणाऱ्या विधानसभांच्या तारखांचीही घोषणा केली आहे. या ठिकाणी टप्प्यात निवडणुका पार पडणार असून, निवडणुकांचा निकाल दिवशी जाहीर केला जाणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन प्रमुख पक्ष फुटल्यानंतर ही पहिली विधानसभेची निवडणूक होत आहे. यामुळे राज्याच्या राजकारणासाठी ही निवडणूक महत्त्वाची असणार आहे. निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाल्याने आजपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. 2019 मध्ये महाराष्ट्रात 21 ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात निवडणुका झाल्या होत्या.
अशी आहे निवडणुकीची तयारी
राज्यात मतदान केंद्र एक लाख 186
एकूण मतदार – 9 कोटी 63 लाख
नवमतदार 20 लाख 63 हजार
पुरुष मतदार 4 कोटी 97 लाख
महिला मतदार 4 कोटी 66 लाख
युवा मतदार 1.85 कोटी
maharashtra vidhansabha election
महत्वाच्या बातम्या