विशेष प्रतिनिधी
पुणे : Ajit Pawar : गळ्यात जाडजुड साेन्याच्या साखळ्या घालून फिरणाऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगल्याच कानपिचक्या दिल्या आहेत. सोन्याचे दागिने स्त्रियांनाच शोभून दिसतात, पुरुषांनी त्या भानगडीत पडू नये. सोन्याच्या जाडजूड चेन घालणारे पुरुष गळ्यात साखळी घातलेल्या बैलांसारखे दिसतात. असे पवारांनी सुनावले.
चाकण येथील एका ज्वेलर्स शोरूम उद्घाटनावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले, सोन्याचे वेड हे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच असते. सुरुवातीपासूनच ही परंपरा चालत आलीये. पण आधुनिक काळात जीवनशैली बदलली आणि लोक मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी करत आहेत. अडीअडचणीला सोने बँकेत गहाण ठेवून नड भागवता येते. पण आपल्याकडे काही लोकांची गोल्डमॅन म्हणूनही ओळख आहे. काहींनी सोन्याचे कपडेही शिवले. हे मात्र जरा अती हाेते.
पुरुष मंडळींना मी एवढंच सांगेन की सोने हे आई, पत्नी, बहीण आणि मुलींच्या अंगावरच शोभून दिसते. पुरुषांच्या अंगावर शोभून दिसत नाही. त्यामुळे पुरुषांनी सोन्याच्या भानगडीत पडू नका, तुम्ही सोने घातले तर बैलाच्या गळ्यात साखळी घातल्यासारखे दिसते ते. उगाचच बैलाला आपण गळ्यात साखळी घालतो, तशा प्रकारच्या सोन्याच्या साखळ्या घालून अनेकजण समोर येतात. अर्थात सोने ते त्यांच्या पैशाने घालत असले, तरी पण सोन्याकडे आपण स्त्रीधन म्हणून पाहतो आणि ते त्यांनाच दिले तर चांगले होईल, अशीही टिप्पणी अजित पवार यांनी केली.
पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्यातील पूरस्थितीबाबत अजित पवार म्हणाले, शेतकऱ्यांचा रोष, नाराजी, राग, विरोध पाहायला मिळाला. जेव्हा घरदार उध्वस्त होते, शेतीचं प्रचंड नुकसान होते, जमीन वाहून जाते, तेव्हा साहजिक अशा प्रतिक्रिया उमटतात. पण आम्ही या शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल, त्या अनुषंगाने निर्णय घ्यायचे ठरवले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीचा दौरा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींना झालेल्या नुकसानीची माहिती दिली असून, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी अशी मागणी केल्याची माहिती अजित पवारांनी दिली. यासाठी विविध विभागांची मदत लागणार आहे. सरकार याबाबत उद्याच्या बैठकीत निर्णय घेईल. दिवाळीपर्यंत बळीराजाला या संकटातून बाहेर काढण्याचे नियोजन आहे. आत्ता तातडीची 5000 रुपये, अन्न-धान्य, कपडे, निवारा अशी मदत केली जात आहे, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
Men wearing gold chains look like bulls… Ajit Pawar’s ear piercings to Goldman leaders
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis गतिमान आणि प्रगतीशील कायदा-सुव्यवस्था उभी करणार! अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांची बैठक
- Russia : ”रशियाने युक्रेनमधील चेर्नोबिल पॉवर प्लांटवर हल्ला केला”
- PM Modi : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे भारत-अमेरिका व्यापार संबंध अधिक मजबूत
- Manipur : मणिपूरमधील कॅम्पमध्ये सीआरपीएफ जवानाने केला गोळीबार अन् नंतर…