विशेष प्रतिनिधी
पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार बापूसाहेब पठारे यांच्या कन्या रुपाली झेंडे पुरंदर तालुक्यातील दिवे गराडे गटातून राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून विजयी झाल्या आहेत. पाेलीस उपायुक्त अमाेल झेंडे यांच्या रुपाली या पत्नी आहेत.
महानगरपालिका निवडणुकीत बापूसाहेब पठारे यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे व सून एश्वर्या पठारे भारतीय जनता पक्षाकडून विजयी झाले आहेत. पठारे यांच्या दुसऱ्या कन्या शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गटातून भारतीय जनता पक्षाकडून जिल्हा परिषदेसाठी लढत आहेत.
दिवे गराडे गटातून राष्ट्रवादीचे दोन्ही पंचायत समिती सदस्य देखील विजयी झाले आहेत. रुपाली झेंडे या पाेलीस उपायुक्त अमाेल झेंडे यांच्या पत्नी आहेत. अमाेल झेंडे यांचे मुळ गाव असलेल्या दिवे गटातून जिल्हा परिषद निवडणूक लढवित हाेत्या. या मतदारसंघात भाजपकडून दिव्या संदीप जगदाळे, शिवसेनेकडून ज्योती राजाराम झेंडे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून रुपाली अमोल झेंडे यांच्यात थेट लढत झाली हाेती.
Bapu Pathare Daughter Rupali Zende wins
महत्वाच्या बातम्या
-
पतीच्या पराभवाचा घेतला बदला, चार महिन्यांच्या मुलीला घेऊन प्रचार करत संस्कृती सातपुते विजयी
-
राष्ट्रवादीला पुणे जिल्ह्यात पहिला धक्का, भाजपचे राजेंद्र गावडे 3, 385 मतांनी विजयी
-
Sudhir Bhau : चंद्रपुरात भाजपचा महापौर होणार ! सुधीरभाऊंचा काँग्रेसला दे धक्का