MLA Satej Patil : ओवेसी यांचा ध्रुवीकरणाचा अजेंडा; आमदार सतेज पाटील यांचा आरोप

विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : MLA Satej Patil ओवेसी यांचा पहिल्यापासून ध्रुवीकरणाचा अजेंडा आहे. मात्र, कोल्हापूर ही शाहू महाराजांची भूमी आहे. त्यांचे हे ध्रुवीकरण इथे चालणार नाही. कोल्हापुरात एक चांगले वातावरण आहे. ते बिघडवण्याचे काम ओवेसींनी करु नये, अशी टीका काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते सतेज पाटील केली आहे. MLA Satej Patil



एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, त्यांच्या या दौऱ्याला हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. ओवेसी हे भडकाऊ भाषणे करतात, त्यामुळे ऐन नवरात्र उत्सवाच्या काळात त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमांना परवानगी देऊ नये, अशी मागणी या संघटनांनी केली आहे.

आमदार पाटील यांनी राज्य सरकारच्या महापुरग्रस्तांबाबत असलेल्या भूमिकेवरही टीका केली. ते म्हणाले, शेतकऱ्याला ज्या पद्धतीने मदत हवी आहे ती मिळत नाही. राज्य सरकारची उदासीनता असून केवळ कागदे नाचवणे सुरु आहे. सरकारने मदतीबाबत टाकलेल्या अटी रद्द करुन सरसकट शेतकऱ्याला न्याय दिला पाहिजे अशी मागणी सतेज पाटलांनी केली आहे.

Owaisi’s polarizing agenda; MLA Satej Patil alleges

महत्वाच्या बातम्या