Navnath Waghmare : नवनाथ वाघमारे यांची गाडी जाळली, जरांगे यांच्या समर्थकांवर संशय व्यक्त

विशेष प्रतिनिधी

जालना : मराठा आरक्षणाविराेधात भूमिका मांडणारे ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची स्कॉर्पिओ गाडी एका अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार जालना शहरातल्या नीलम नगर भागात रविवारी रात्री घडला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक जण कारला आग लावताना दिसत आहे.



नवनाथ वाघमारे यांची गाडी कॉलनीत उभी होती त्या ठिकाणी एक अज्ञात व्यक्ती हातामध्ये ज्वलनशील पदार्थ घेऊन आला. गाडीवर टाकलेल्या कव्हरवर पहिल्यांदा कॅनमध्ये असलेले पूर्ण ज्वलनशील पदार्थ चारही बाजूंनी टाकले. त्यानंतर ही आग लावून दिली. या आगीने भडका घेताच गाडीवर टाकलेले कव्हर क्षणातच जळून खाक झाले.
या प्रकरणी नवनाथ वाघमारे यांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिस सीसीटीव्ही च्या आधारे तपास करत आहेत.या घटनेमध्ये गाडीचे प्रचंड नुकसान झाले आहे. गाडीला आग लागल्याचे परिसरातील नागरिकांनी पाहताच त्यांनी आरडाओरड केला. तसेच गाडीवर पाणी टाकून आग आटोक्यात आणली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सीसीटीव्ही फूटेजची तपासणी केली. यामध्ये एक अज्ञात व्यक्ती दिसल्याची माहिती समोर आली आहे.
‘माझी गाडी जाळली हा जरांगे समर्थकांचा कट असून यापुढे जरांगे यांच्या गाड्या जाळल्या तर आश्चर्य वाटून घेऊ नका. गाडी जाळल्याप्रकरणी मनोज जरांगे, शरद पवार, रोहित पवार, अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यावर गुन्हे दाखल करा अशी मागणी नवनाथ वाघमारे यांनी केली आहे.

Navnath Waghmare’s car burned, suspicions raised on Jarange’s supporters

महत्वाच्या बातम्या