विशेष प्रतिनिधी
पुणे : मी दुष्काळ पाहिला, मात्र अशी अतिवृष्टी मी यापूर्वी कधीही पाहिली नाही. शेतकरी राजा, पुन्हा एकदा कसा उभा करायचा याचा प्रयत्न केला पाहिजे, असे आवाहन राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले आहे.
यंदाच्या वर्षी महाराष्ट्रात अभूतपूर्व अतिवृष्टी झाली, मराठवाड्यातील दुष्काळी जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. त्याचा प्रचंड मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. यावर शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, ज्या जिल्ह्यात कमी पाऊस असतो त्या जिल्ह्यात अतिवृष्टी हाेत आहे. सोलापूर, लातूर, धाराशिव, जालना, औरंगाबाद परभणी नगर या सगळ्या भागात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्याच अतोनात नुकसान झाले आहे. असं संकट जेव्हा येतं तेव्हा त्यांना मदत करण्याची जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकारची असते. नैसर्गिक आपत्ती असेल तर त्याला सहाय्य करण्याची योजना केंद्र सरकारमध्ये आहे. त्या योजनेची राज्यामार्फेत अंमलबजावणी केली जाते. राज्याने अतिशय वेगाने पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे.
शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, जमिनी वरील माती वाहून गेली तर कायमचे नुकसान होते. त्यामुळे पीक गेले म्हणून चालणार नाही. पिकांसोबत जमीन आणि पाणंद रस्ते यांचे पंचनामे करावे लागतील. गुरे देखील वाहून गेली आहेत. त्यांचे पंचनामे गतीने करावे लागतील. शेतकऱ्याला विश्वासात घेऊन तातडीची आणि कायमस्वरूपीची मदत शेतकऱ्यांना देण आवश्यक आहे. राज्य आणि केंद्र सरकारने नैसर्गिक आपत्तीमध्ये साहाय्य करण्याची योजना आहे. शेतकरी राजा, पुन्हा एकदा कसा उभा करायचा याचा प्रयत्न केला पाहिजे. हवामान खात्याने सांगितलं पुढील 4 दिवस पाऊस आहे. पहिल्यांदा असं घडतेय हवामान खाते जे जे सांगतेय ते ते होत आहे.
Never seen such heavy rain: Sharad Pawar appeals to the central and state governments to help
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!