विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणात एका मोठ्या राजकीय भूकंपाची अधिकृत घोषणा झाली आहे. आगामी २०२५-२६ च्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांनी हातमिळवणी केली आहे. ७३ जिल्हा परिषद गट आणि १४६ पंचायत समिती गणांमध्ये ही आघाडी एकत्रितपणे ‘शड्डू’ ठोकणार असल्याने प्रस्थापित पक्षांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. Pune Zilla Parishad
संविधानवादी विचारधारेची एकजूट-
पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीरंग पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा समन्वयक अॅड. प्रियदर्शी तेलंग यांनी एका संयुक्त पत्रकार परिषदेत या युतीवर शिक्कामोर्तब केले. “ही युती केवळ निवडणुका जिंकण्यासाठी नसून, संविधानाचे रक्षण करण्यासाठी आणि वंचित-बहुजन घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आहे,” अशी भूमिका दोन्ही नेत्यांनी यावेळी मांडली. मतांचे विभाजन रोखणे हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले.
जागावाटप आणि उमेदवार निवड मिळालेल्या माहितीनुसार, या आघाडीची उमेदवार निवड प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबवण्यात आली आहे.
तालुका स्तरावर चाचपणी:
दोन्ही पक्षांच्या तालुका अध्यक्षांनी स्थानिक ताकद आणि जनमताचा कौल घेऊन संभाव्य उमेदवारांची यादी तयार केली आहे.अंतिम मान्यता: जिल्हा पातळीवरील नेतृत्वाने या यादीला हिरवा कंदील दिला असून, अर्ज भरण्याच्या प्रक्रियेनंतर कोणत्या जागा कोणाकडे राहतील, याचे चित्र स्पष्ट होईल.
निरीक्षकांची उपस्थिती-
यावेळी काँग्रेसचे निरीक्षक प्रशांत जगताप आणि अॅड. अभय छाजेड यांच्या उपस्थितीमुळे या आघाडीला प्रदेश नेतृत्वाचाही भक्कम पाठिंबा असल्याचे दिसून येत आहे.राजकीय परिणामांची चर्चा पुणे जिल्हा हा नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे.
मात्र, काँग्रेसच्या पारंपारिक ग्रामीण मतपेढीला वंचित बहुजन आघाडीच्या कॅडर बेस मतांची जोड मिळाल्यास अनेक ठिकाणी अनपेक्षित निकाल लागू शकतात. विशेषतः ज्या जागांवर दलित आणि ओबीसी मतदारांची संख्या निर्णायक आहे, तिथे ही ‘महाआघाडी’ प्रस्थापितांचे गणित बिघडू शकते.
New political equations in the Pune Zilla Parishad; the Congress-Vanchit ‘Grand Alliance’ enters the electoral fray!
महत्वाच्या बातम्या
- Shinde Sena : काेल्हापुरातही शिंदेसेनेचा महापाैरपदावर डाेळा, काॅंग्रेससाेबत एकत्र येण्याची तयारी?
- डाॅ. संग्राम पाटील यांची मुंबई विमानतळावर पुन्हा चौकशी
- Shiv Sena : शिवसेना काेणाची, धनुष्यबाण काेणाच्या हातात: बुधवारपासून सर्वाेच्च न्यायालयात अंतिम सुनावणी
- महापौर पदाच्या आरक्षणाची साेडत 22 जानेवारीला