रवींद्र चव्हाण यांच्या नावाचा गैरवापर करून अपक्षांचा विजय, नितेश राणे यांचा आरोप

विशेष प्रतिनिधी

सिंधुदुर्ग  : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मोठा विजय मिळविला आहे. मात्र पाच अपक्ष निवडून आल्याने मंत्री नितेश राणे संतप्त झाले आहेत. या अपक्षांनी रवींद्र चव्हाण यांच्या नावाचा गैरवापर करून भाजपचे अधिकृत उमेदवार पाडले असा आरोप राणे यांनी केला. Nitesh Rane

“देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर सिंधुदुर्गाच्या जनतेने विश्वास दाखवला आहे, मात्र काही लोकांनी महायुतीत राहूनच ‘कमळ’ पाडण्याचे काम केले,” असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. विशेषतः
जिल्ह्यात निवडून आलेल्या पाच अपक्ष उमेदवारांवर बोलताना नितेश राणे यांनी त्यांची ‘भाजप बंडखोर’ अशी ओळख करून दिली. “या अपक्षांनी रवींद्र चव्हाण यांच्या नावाचा गैरवापर करून भाजपचे अधिकृत उमेदवार पाडले.



शर्टावर कमळ लावायचे आणि दुसरीकडे कमळ पाडण्यासाठी ताकद लावायची, हा प्रकार महायुतीला गालबोट लावणारा आहे,” असा संताप नीतेश राणे यांनी व्यक्त केला. जर या लोकांनी खोडा घातला नसता, तर सिंधुदुर्गातील ५० पैकी ५० जागांवर महायुतीचा एकतर्फी विजय झाला असता, असा दावाही त्यांनी केला.

नितेश राणे यांनी या विजयाचे श्रेय देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाला दिले. सत्तेचा वापर करून ग्रामीण भागातील शेवटच्या टोकापर्यंत विकास पोहोचवणार असल्याचे ते म्हणाले. राणे साहेबांनी जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न साडेचार लाखांपर्यंत नेण्याचा संकल्प केला आहे, तो जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून साध्य करू, असा विश्वासही नीतेश राणे यांनी व्यक्त केला.

Nitesh Rane Alleges Independents Won by Misusing Ravindra Chavan’s Name

महत्वाच्या बातम्या