विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: Devendra Fadanvis खोक्या असो की बोक्या, की ठोक्या, कोणालाही सोडणार नाही. सर्वांना ठोकणार, असा कडक इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला.Devendra Fadanvis
बीडमधील भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता खोक्या उर्फ सतीश भोसले याच्या घरावर आज बुलडोझर कारवाई करण्यात आली आहे. सहा दिवसांपासून फरार असलेला खोक्या भोसले याला उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून अटक करण्यात आली आहे. त्याला आज रात्रीपर्यंत बीडमध्ये आणले जाणार आहे.
खोक्यावर झालेल्या बुलडोझर कारवाईनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, खोक्या असो की बोक्या, की ठोक्या, सर्वांना ठोकणार. राज्यात गुन्हेगारांना थारा दिला जाणार नाही असा संदेश दिला आहे.
🕕 5.57pm | 13-3-2025📍New Delhi.
LIVE | Media Interaction#Maharashtra #NewDelhi https://t.co/H3Xsrrt3NA
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 13, 2025
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर सर्वच पक्षांच्या आमदारांच्या निकटवर्तीयांचे मारहाण आणि दादागिरीचे व्हिडिओ समोर येत आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आवाज उठवणारे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता खोक्या भोसले याचा एका व्यक्तीला बॅटने मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आला. त्यानंतर त्याच्यावर तीन गुन्हे दाखल करण्यात आले. वनविभागानेही खोक्या भोसलेवर कारवाई केली. वनविभागाच्या ताब्यातील जमीनीवर बांधलेल्या त्याच्या घरावर वनविभागाने नोटीस बजावली. आज नोटीशीला सात दिवस झाले तरीही उत्तर आले नाही. त्यामुळे वनविभागाने थेट बुलडोझर कारवाई केली आहे.
No one will be spared, everyone will be beaten, warns the Chief Minister
महत्वाच्या बातम्या
- Amarsingh Pandit धनंजय देशमुख यांच्या साडूचा प्रताप! राष्ट्रवादीचा आणखी एक नेता अडचणीत
- Shambhuraj Desai प्रकल्पग्रस्तांवार अन्याय होऊ देणार नाही, शंभूराज देसाई यांचे आश्वासन
- Beed : बीडमध्ये जातीयवाद संपविण्यासाठी पोलीस अधीक्षकांचा अभिनव निर्णय
- Manoj Jarange : गोड बोलून जनतेची मान कापली,आता भूमिका आंदोलनाची, मनोज जरांगे यांचा इशारा