Opposition demands : शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी माेठ्या पॅकेजची गरज, विशेष अधिवेशन बाेलवा : विराेधकांची राज्यापालांकडे मागणी

विशेष प्रतिनिधी

मुंबई :Vijay Wadettiwar, Jayant Patil राज्यात मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे संसार उध्दवस्त झाले आहेत. अतिवृष्टीच्या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी मोठ्या पॅकेजची गरज आहे. त्यासाठी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवा अशी मागणी विरोधी पक्षातील नेत्यांनी राज्यपालांना पत्र लिहून मागणी केली आहे. Opposition demands



विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी म्हटलंय की, अभूतपूर्व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आणि सामान्य नागरिक संकटात सापडला आहे. त्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. तब्बल ४ लाख हेक्टरहून अधिक पिके नष्ट झाली आहेत. जनावरे वाहून गेली, घरे कोसळली, काही ठिकाणी जीवितहानी झाली आहे. रस्ते खचले, दळणवळणाची सेवा खंडित झाली आहे. पिण्याचे पाणी दूषित झाल्याने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे या गंभीर संकटातून राज्याला बाहेर काढण्यासाठी तातडीने ठोस धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे. Opposition demands

तातडीच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यासाठी ठोस निर्णय घेण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन त्वरीत बोलवावे .
अतिवृष्टीमुळे शेतकरी , जनावरे, घरे, जनजीवन सर्व उद्ध्वस्त झाले आहे. परंतु, सरकारकडून आवश्यक मदत होताना दिसत नाही. शेतकरी व नागरिकांचे प्रश्न ऐकले जावेत, नुकसान भरपाई व मदत पॅकेजवर सखोल चर्चा व्हावी, भरीव मदतीचा निर्णय व्हावा यासाठी महाराष्ट्र विधानमंडळाचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन तातडीने बोलवावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने राज्यपालांना केल्याचं माजी मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सांगितले.

Need for a huge package to get farmers out of crisis, call for special session: Opposition demands from Governor

महत्वाच्या बातम्या