मराठी माणसासाठी आमचा लढा सुरुच राहील ! अमित ठाकरे यांचा विश्वास

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र आणि ‘मराठी माणसाच्या हितासाठी आमचा लढा यापुढेही सुरुच राहील. खचून जाऊ नका… ‘मराठी’ला आणि मराठी माणसाला कधीच एकटं पडू देणार नाही… हा शब्द आहे ठाकरेंचा असा विश्वास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. Amit Thackeray

मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाशी युती करूनही मनसेचा दारुण पराभव झाला. या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, निकाल काहीही असो…

खंत एकाच गोष्टीची वाटते की, माझ्या मराठी माणसाला जे अपेक्षित होतं, ते देण्यासाठी मला कदाचित अजून थोडी मेहनत घ्यावी लागेल. पण एक लक्षात ठेवा, माझं आणि तुमचं नातं फक्त एका ‘बटनापुरतं किंवा ‘मतापुरतं’ कधीच नव्हतं. राजकारणात जय-पराजय होतच असतो, पण माणसांची मन जिंकणं माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे.

तुम्ही आम्हाला जे प्रेम आणि साथ दिली, ती कोणत्याही सत्तेपेक्षा मोठी आहे. माझा शब्द आहे तुम्हाला… सत्ता असो किंवा नसो, तुमच्या हक्कासाठी महाराष्ट्र सैनिक आणआणि शिवसैनिक नेहमी धावून येतील, असा विश्वास अमित ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

Our Fight for the Marathi Manoos Will Continue, Says Amit Thackeray

महत्वाच्या बातम्या