PM Modi : पंतप्रधानांकडून गोवा येथे लागलेल्या आगीत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: PM Modi  पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi ) यांनी अर्पोरा, गोवा येथे आगीच्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या नागरिकांच्या प्रकृतीत लवकरात सुधारणा व्हावी, यासाठी त्यांनी प्रार्थनाही केली.



पंतप्रधानांनी (PM Modi ) सांगितले की त्यांनी या दुर्घटनेबाबत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केली आहे. राज्य सरकार या दुर्घटनेत प्रभावित झालेल्यांना सर्वतोपरी मदत पुरवत असल्याचे त्यांनी नमूद केले.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले आहे;गोवा, अर्पोरा येथील आगीची दुर्घटना अतिशय दु:खद आहे. आपल्या प्रियजनांना गमावलेल्या सर्वांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमी लवकर बरे होवोत. या स्थितीबाबत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत जी यांच्याशी चर्चा केली. राज्य सरकार प्रभावितांना सर्वतोपरी मदत पुरवत आहे. तसेच पंतप्रधानांनी पीएमएनआरएफ मधून प्रत्येक मृत व्यक्तीच्या निकटवर्तीयांना ₹ 2 लाख आणि जखमींना ₹ 50,000 इतके अनुदान जाहीर केले आहे.”

पंतप्रधान कार्यालयाने X वर पोस्ट केले आहे; “अर्पोरा, गोवा येथील दुर्घटनेत मृत झालेल्यांच्या निकटवर्तीयांना पीएमएनआरएफ मधून ₹ 2 lakh इतके अनुदान दिले जाणार आहे. जखमींना Rs. 50,000 दिले जातील.
गोव्यातील एका नाईट क्लबमध्ये सिलींडर स्फोट झाल्याने 25 लोकांचा मृत्यू झाला.
गोव्याचे डीजीपी आलोक कुमार यांनी सांगितले की, 23 लोकांचे मृतदेह सापडले आहेत.
मरण पावलेल्यांमध्ये बहुतेक क्लबमध्ये काम करणारे कर्मचारी होते. डीजीपी म्हणाले- आग सर्वात आधी तळमजल्यावरच्या स्वयंपाकघरातून क्लबच्या इतर भागांमध्ये पसरली. त्यामुळे सर्वाधिक मृतदेह स्वयंपाकघराच्या परिसरातून मिळाले आहेत. पळून जाण्याच्या प्रयत्नात दोन लोकांचा मृत्यू जिन्यावर झाला.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि स्थानिक आमदार मायकल लोबो घटनास्थळी पोहोचले. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मृतांमध्ये तीन महिला आणि ३-४ पर्यटकांचा समावेश आहे.

ते म्हणाले की, तिघांचा मृत्यू भाजल्याने झाला असून, उर्वरित लोकांचा मृत्यू गुदमरल्याने झाला आहे. या अपघाताची सखोल चौकशी केली जाईल आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.

सध्या मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नाईट क्लबने अग्निसुरक्षा नियमांचे पालन केले नव्हते. घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या अनेक गाड्यांनी क्लबला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवले आहे.

PM Modi condoles loss of life in Goa fire

महत्वाच्या बातम्या