विशेष प्रतिनिधी
मुंबई: Dhurandhar पाकिस्तानी दहशतवादाचे वास्तव जसेच्या तसे पडद्यावर आणल्याने पुरोगाम्यांना पोटशूळ उठला आहे. आदित्य धर यांच्या ‘धुरंधर’ या गुप्तहेर थरारपटाने पाकिस्तानच्या आयएसआय, लियारीतील स्थानिक गुंड, दहशतवादी संघटनांचे जाळे आणि भारताविरोधातील “हजारो वारांची नीती” निर्भीडपणे दाखवली. पण हे वास्तववादी चित्रण पुरोगाम्यांना पचले नाही. त्यांनी चित्रपटाला “प्रोपगंडा”, “ट्रोल संस्कृती” आणि “रेज बाईट” अशी लेबले लावून संताप व्यक्त केला.Dhurandhar
पुरोगाम्यांचे लाडके संकेतस्थळ असलेल्या द वायर’चे समीक्षक तत्सम मुखर्जी यांनी दिलेल्या कठोर पुनरावलोकनावरून चित्रपटकृतीपेक्षा पाकिस्तानला वाचवण्याची धडपड अधिक दिसते, अशी टीका होत आहे. चित्रपटात पाकिस्तान समर्थित दहशतवादाचे निर्भीड चित्रण, 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या खऱ्या संभाषणांचा समावेश आणि भारताच्या सुरक्षा नितीत आलेला बदल दाखवल्यामुळे ‘द वायर’ने विरोधाचा सूर लावला. समीक्षकांच्या प्रतिक्रियेवरून एक गोष्ट स्पष्ट झाली की, भारतावर झालेले अत्याचार दाखवले, की त्यांना ते “अतिराष्ट्रवाद” वाटते, पण पाकिस्तानी एजंट्सना बिकिनी परिधान करून नाचवले की ते “विश्वबंधुत्व” मानतात.Dhurandhar
2023 मधील ‘पठाण’ चित्रपटात आयएसआयची एजंट बिकिनीमध्ये शाहरुख खानसोबत नाचताना दिसली. भारत–पाकिस्तान संघर्ष प्रेमगीतांच्या दरम्यान गहाळ झाला. दहशतवादाला सौम्य भावनिक पार्श्वकथा देण्यात आली. तरीही ‘द वायर’ने या चित्रपटाला “मोठे हृदय”, “राजकीय दिलासा” आणि “दिलों को जोडनेवाला सिनेमॅटिक पूल” असे तोंडभरून कौतुक केले. काही समीक्षणांमध्ये तर चित्रपटाची तुलना राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’शी करण्यात आली.
याउलट वास्तविक दहशतवादाचे चित्रण करणाऱ्या ‘धुरंधर’ला त्यांनी विषारी, धोकादायक आणि जनतेला भडकवणारे ठरवले. दोन भिन्न प्रतिक्रिया एकाच सूत्राकडे निर्देश करतात, अशी टीका होत आहे: सिनेमाचे मूल्यांकन ते चित्रपट कोणत्या विचारसरणीला पूरक आहे, यावर ठरवले जाते.
चित्रपटात दाखवलेले काही मुद्दे ‘द वायर’ला कटू वाटले आहेत. यामध्ये आयएसआय अधिकाऱ्यांचे जिहादी भाषण, पाकिस्तानच्या दहशतवाद–अंडरवर्ल्ड–गँग कनेक्शनचे उघड चित्रण, भारतावर केलेल्या 26/11 हल्ल्याची वस्तुस्थिती 2014 पूर्वीच्या राष्ट्रीय सुरक्षेतील शिथिलपणापाकिस्तानने भारताच्या शोकांतिकांवर केलेली हेटाळणी यांचा समावेश आहे.
या सर्व गोष्टी ‘द वायर’च्या समीक्षणात “विषारी राष्ट्रवाद” म्हणून मांडल्या गेल्या, कारण ते पाकिस्तानच्या निर्मळ प्रतिमेला बाधा आणतात, अशी टीका नागरी समाजात होत आहे.
टिका करणारे म्हणतात, ‘द वायर’ला भीती आहे ती सिनेमातील सत्याची. कारण वास्तव जेव्हा पडद्यावर निर्भीडपणे उतरते, तेव्हा वर्षोंपासून चालणारा ‘दोन राष्ट्रांमध्ये बनावट मैत्री’चा आख्यान ढासळतो.दहशतवाद दाखवणे “द्वेष” ठरते, पण आयएसआय अधिकाऱ्यांना ग्लॅमराइज करणे “समन्वय” ठरते, ही त्यांची दोन भिन्न मापदंड स्पष्टपणे दिसतात.
‘धुरंधर’ने सत्य सांगितले, म्हणून पुरोगामीअस्वस्थ झाले, अशी प्रतिक्रिया सिनेरसिकांमध्ये उमटत आहे. “सत्य सांगणारा चित्रपट रक्तपाती, पण खोटे दाखवणारा चित्रपट सौहार्दाचा दूत?” असा प्रश्न उपस्थित केला जातो. म्हणजेच, काही माध्यमांसाठी पाकिस्तानचे वास्तविक चेहरे दाखवणे ‘पाप’, आणि त्यांना स्वच्छ धुतल्यासारखे दाखवणे ‘सहिष्णुता’ ठरते.
Progressives Fume as ‘Dhurandhar’ Exposes Pakistan’s Brutal Reality
महत्वाच्या बातम्या
- Supriya Sule : नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीतील गोंधळ राज्यसभेत; सुप्रिया सुळे यांची सरकारवर टीका
- Dr. Gauri Garje-Palve : डाॅ. गाैरी गर्जे- पालवे यांचा तिघांकडून गळा दाबून खून, वडीलांचा आरोप
- Uddhav Thackeray : पेगाससचेच नाव बदलून संचारसारथी, उध्दव ठाकरे यांचा माेदी सरकारवर हेरगिरीचा आरोप
- Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध