नवे जिल्हे आणि तालुके निर्मितीचा प्रस्ताव पण जनगणनेची आकडेवारी आल्यावरच: चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले स्पष्ट

विशेष प्रतिनिधी

चंद्रपूर : राज्यातील अनेक भागातून नवीन जिल्हे आणि तालुके निर्माण करण्याची मागणी होत आहे. नवे 20 जिल्हे आणि 81 तालुके निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे, मात्र जोपर्यंत जनगणनेची आकडेवारी येत नाही तोपर्यंत त्यावर निर्णय घेता येणार नाही असे राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे Chandrashekhar Bawankule

चंद्रपुरात बोलत असताना बावनकुळे म्हणाले, नवीन लोकसंख्या आणि भौगोलिक स्थिती पाहून नवीन जिल्हे आणि तालुके तयार करण्यावर विचार करता येईल. नवीन जनगणनेची आकडेवारी आली की भौगोलिक परिस्थिती पाहून नवीन जिल्हे आणि तालुके निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे.

नवीन जिल्हे आणि तालुके तयार करण्याची प्रक्रिया प्रशासनिक, सामाजिक, आर्थिक आणि विकासात्मक कारणांवरआधारित असते. मोठ्या जिल्ह्यात किंवा तालुक्यात प्रशासन कार्य करणे अवघड होते. नवीन जिल्हा किंवा तालुका तयार करून कायदे, पोलीस, महसूल यांचे काम अधिक जलद व प्रभावी करता येते. सरकारी योजना आणि सेवांचा अधिक परिणामकारक वितरण होतो.

दरम्यान, राज्यात नव्याने जिल्ह्याची निर्मिती केली जाणार नसून, बारामती स्वतंत्र जिल्हा नसेल. तसा कोणताही प्रस्ताव नाही. या अफवा आहेत,’ असे स्पष्टीकरण जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले होते. राज्यात नव्याने काही जिल्ह्यांची निर्मिती केली जाणार असून बारामती हा स्वतंत्र जिल्हा असेल, अशी चर्चा प्रसारमाध्यमातून होत आहे.

Proposal to create new districts and talukas but only after census data comes: Chandrashekhar Bawankule clarified

महत्वाच्या बातम्या