Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी सत्ताधारी आमदार आक्रमक

विशेष प्रतिनिधी

नागपूर : Tukaram Mundhe सनदी अधिकारी तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्या समर्थकाकडून धमकी दिल्याची तक्रार आमदार कृष्ण खोपडे यांनी केली आहे. आरोपीला तातडीने अटक करावी व मुंडेवर कारवाई करावी अशी मागणी केली.



आमदार प्रवीण दटके यांनी हा मुद्दा उचलून धरला. मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून चौकशी केली जाईल व योग्य कारवाई होईल असे आश्वस्त केले. त्यानंतरही सत्ताधारी आमदार आक्रमक झाले. अध्यक्षांच्या आसनासमोर येऊन कारवाईची मागणी करू लागले. तालिका अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले. Tukaram Mundhe

तुकाराम मुंडे प्रकरणी लक्षवेधी मांडून त्यांना निलंबित करण्याची मागणी करणारे भाजप आमदार कृष्णा खोपडे यांना धमकीचे दोन कॉल आल्यानंतर कृष्णा खोपडे यांनी नागपूर पोलिसांकडे त्याची तक्रार केली आहे. या तक्रारीत फोनवरुन धमकी देणाऱ्या व्यक्तीचा मोबाईल नंबर आणि नावही त्यांनी लिहून दिलं आहे. तुम्ही तुकाराम मुंढेंविरुद्ध का बोलत आहात, त्यांच्या निलंबनाची मागणी तुम्ही का करत आहात? असे प्रश्न विचारला.

मुख्यमंत्री कार्यालय, विधानसभा अध्यक्ष कार्यालय याशिवाय कृष्णा खोपडे यांनी नागपूरचे पोलीस आयुक्त तसेच स्थानिक सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये धमकीच्या कॉलसंदर्भात तक्रार दाखल केली आहे. तुकाराम मुंडे यांच्या विरोधात कारवाईची मागणी केल्यानंतर मला पाहून घेण्याची धमकी आणि शिवीगाळ करणारे फोन कॉल येत असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. ज्या दोन फोन क्रमांकावरून धमकीचे कॉल आले, ते दोन्ही नंबर पोलिसांना देत कृष्णा खोपडे यांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे. विशेष म्हणजे भाजप आमदार हिवाळी अधिवेशनात तुकाराम मुंडे यांच्या विरोधात लक्षवेधी मांडून नागपूरात नियमबाह्य पद्धतीने स्मार्ट सिटीचा कार्यभार बळकावून आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी आणि महिला अधिकाऱ्यांशी दुर्व्यवहार केल्याप्रकरणी कारवाईची मागणी करणार आहे, असा इशारा आमदार खोपडे यांनी केले आहे.

तुकाराम मुंढेंच्या संदर्भातील तक्रारीवरुन काँग्रेस नेते आक्रमक झाले असून आमदार नाना पटोले यांनी थेट पार्थ पवार यांच्या प्रकरणाशी तुलना केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात चौकशी समिती गठित करावी, असं आव्हान काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिलं आहे. पार्थ पवार प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी विकास खारगेंच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमली आहे. या पद्धतीच्या चौकशीचा आणि कमिटीचा फार्स करून जनतेची जी दिशाभूल चाललेली आहे. महाराष्ट्र रोज लुटण्याचं काम सुरू आहे. तुमच्यात खरोखरच हिंमत असेल आणि ‘दूध का दूध पाणी का पाणी’ करायचं असेल तर, तुकाराम मुंढेंच्या अध्यक्षतेखाली कमिटी बसवा.”

Ruling party MLAs turn aggressive demanding action against Tukaram Mundhe

महत्वाच्या बातम्या