Rupali Patil-Thombre : खरात सेक्स रॅकेट प्रकरणात रुपाली चाकणकरांना सक्रिय सहभाग , रूपाली पाटील ठोंबरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

विशेष प्रतिनिधी

पुणे : Rupali Patil-Thombre  महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या ‘कॅप्टन खरात’ सेक्स रॅकेट प्रकरणात आता एक अत्यंत खळबळजनक वळण आले आहे. झाशीची राणी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अॅड. रुपाली पाटील-ठोंबरे यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना पत्र लिहून महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली निलेश चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या रॅकेटमध्ये चाकणकर या मुख्य सूत्रधार असल्याचा दावा करत त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.Rupali Patil-Thombre

रुपाली पाटील-ठोंबरे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, भोंदूबाबा कॅप्टन खरात याने केलेली सर्व कृत्ये ही केवळ रुपाली चाकणकर यांच्या सक्रिय सहभागामुळे आणि पाठिंब्यामुळेच शक्य झाली आहेत.Rupali Patil-Thombre



मागील वर्षी एका पत्रकाराने खरातचा पर्दाफाश केला असता, चाकणकर यांनी त्याला फोन करून कारवाईची धमकी दिली आणि माफीनामा घेण्यास भाग पाडले. खरातच्या गैरकृत्यांची माहिती असूनही त्यांनी त्याला पाठीशी घातले. तसेच पोलीस यंत्रणेवर दबाव: नाशिक ग्रामीणमधील बावी पोलीस स्टेशन येथे खरातचा लैंगिक शोषणाचा व्हिडिओ व्हायरल होऊ नये आणि त्याला वाचवण्यासाठी चाकणकर यांनी पोलिसांवर दबाव टाकून गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले, असा आरोप ठोंबरे यांनी केला आहे. तसेच शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये फोन करून कॅप्टन खरातला वाचवण्यासाठी चाकणकर यांनी प्रयत्न केल्याचा दावाही पत्रात करण्यात आला आहे.

“लाडक्या बहिणींना न्याय मिळावा” “रुपाली चाकणकर यांनी पुणे आणि इतर ठिकाणी आपल्या पदाचा गैरवापर करून पोलिसांवर दबाव टाकला आहे. या रॅकेटमधील सत्य परिस्थिती बाहेर येण्यासाठी आणि पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी चाकणकर यांना तात्काळ ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करणे आवश्यक आहे,” असे ठोंबरे यांनी पत्रात नमूद केले आहे.

Rupali Chakankar Accused of Active Role in Kharat Sex Racket; Rupali Patil-Thombre Writes to Chief Minister

महत्वाच्या बातम्या