विशेष प्रतिनिधी
मुंबई : Santa Claus अॅक्सिस बँकने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नुकतीच ‘दिल से ओपन सेलिब्रेशन 2025’ ही जाहिरात मोहीम सुरू केली. मात्र, या जाहिरातीमुळे मोठा वाद उफाळून आला आहे.या व्हिडिओ जाहिरातीत नवरात्रीच्या गरब्याचा माहोल दाखवला आहे आणि अचानक सांताक्लॉजचा प्रवेश दाखवला आहे. परंतु यामुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.Santa Claus
दिवाळी व नवरात्रीच्या उत्सवात ख्रिसमसचे प्रतीक मानला जाणारा सांताक्लॉज आणून उत्सव सर्वांचा आहे, सर्वांनी मिळून साजरा करावा असा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. परंतु यामुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.Santa Claus
सोशल मीडियावर अनेक वापरकर्त्यांनी अॅक्सिस बँकवर हिंदू सणांचे ‘ख्रिश्चनीकरण’ केल्याचा आरोप केला आहे. ट्विटर/X वर #BoycottAxisBank हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला आहे.The Jaipur Dialogues या हँडलवरून लिहिले आहे, “नवरात्रीला सांताक्लॉज दाखवणे म्हणजे हिंदू सणांचा अपमान आहे. अॅक्सिस बँकेने ही जाहिरात तातडीने मागे घ्यावी, अन्यथा त्यांना बहिष्काराला सामोरे जावे लागेल.”Santa Claus
Treeni नावाच्या वापरकर्त्याने लिहिले: “नवरात्रीचे ख्रिश्चनीकरण? अॅक्सिस बँक हिंदू धर्माची थट्टा करत आहे. आता पुढच्या हिंदू सणांमध्येही असेच करणार का?”
The Christianization of Navratri?@AxisBank is mocking Hinduism by depicting Santa Claus distributing gifts during Navratri and plans to continue this throughout all upcoming Hindu festivals!https://t.co/je5a6dXOpN
— Treeni (@treeni) September 22, 2025
तर Advaita नावाच्या वापरकर्त्याने थेट प्रतिक्रिया दिली: “मी माझे विमा आणि खाते बंद करणार आहे. आमच्या नवरात्रीशी या बगरचा काय संबंध?”
नेटकऱ्यांचा सवाल आहे की, “हिंदू सणांमध्येच असे प्रयोग का केले जातात? ईदच्या जाहिरातीत सांताक्लॉज दाखवतील का? किंवा ख्रिसमसच्या जाहिरातीत इस्लामिक प्रतीक दाखवतील का? मग नवरात्रीत सांताक्लॉज का?”या जाहिरातीमुळे अॅक्सिस बँक सध्या सोशल मीडियावर तीव्र टीकेचा सामना करत आहे.
Santa Claus’ entry in Garba, controversy over Axis Bank advertisement
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!