Sharad Pawar शरद पवार जरांगेंचे राजकीय ‘डॅडी’; सदावर्ते

विशेष प्रतिनिधी 

मुंबई : Sharad Pawar गणेशोत्सवादरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला आरक्षणाची मागणी घेऊन आझाद मैदानावर मोर्चा काढला होता. यानंतर त्यांच्या काही मागण्या मान्य करणार जीआर देखील शासनाने काढला. मात्र जरांगे पाटील यांच्यावर राजकीय वरदहस्त असल्याचा चर्चांना देखील बऱ्यापैकी उधाण आले होते. सतत कोणत्या ना कोणत्या मोठ्या नेत्यांशी त्यांचं नाव जोडलं जात होतं.

जरांगे यांचे नाव विविध नेत्यांशी जोडलं जात होतं. त्यांच्यावर राजकीय वरदहस्त असल्याचा तसेच त्यांना राजकीय पाठबळ मिळत असल्याच्या चर्चा देखील राज्यात उघड उघड केल्या जात होत्या. यात प्रामुख्याने शरद पवार यांचे नाव सतत समोर येत होते. आता पुन्हा एकदा वकील गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगे हे शरद पवार यांच्यासाठीच काम करत असल्याचा आरोप केला आहे. Sharad Pawar



काय म्हणाले सदावर्ते?

मराठा आरक्षणावर बोलताना अॅड. गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, ‘शरद पवार गटाचे वृद्ध पुढारी शरद पवार जेव्हा ऑफ सीझनमध्ये असतात, सत्तेत नसतात किंवा राज्यामध्ये एखादा मराठा मुख्यमंत्री नसतो, त्यावेळी शरद पवार यांची बुद्धी फार फास्ट चालत असते. त्या फास्ट बुद्धीचा परिणाम म्हणजे जरांगे यांच्यासारखा ढोंगी माणूस पुढे आणला जातो आणि त्यांच्यामार्फत राजकारण खेळले जाते.’

पुढे, ‘मनोज जरांगे यांनी शरद पवार सांगतील तेच बोलावे. कारण शरद पवार हे जरांगे यांचे राजकीय डॅडी आहेत.’ असा थेट आरोप त्यांनी शरद पवार यांच्यावर केला आहे. तसेच, ‘मराठवाड्यातील माझे मराठा बांधव हे 96 कुळी मराठा आहेत. ते सोशली हॅन्डीकॅप नाहीत, ते असे खोटं आरक्षण घेणार नाही.’ असे देखील सदावर्ते यांनी सांगितले. Sharad Pawar

दरम्यान सदावर्ते यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना ही काही सवाल केले. त्यांनी म्हटले की, ‘कोणत्याच समाजाचे आरक्षण हिरावून घेणार नाही असे तुम्ही पत्रकारांशी बोलताना सांगत आहात. मात्र एखाद्या कायद्याच्या विरोधात जाऊन शासन निर्णय टीकत नसतो. विखे पाटील जो शासन निर्णय टिकू दे असे म्हणत आहे तो तुमच्या विभागाचा आहे का? तुम्ही सामाजिक न्याय विभागाचे मंत्री आहात का?’ असे खोचक प्रश्न सदावर्ते यांनी विखे पाटलांना केले आहेत.

दरम्यान, गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी देखील पवारांना चांगलेच फैलावर घेतले आहे. ‘शरद पवारांना आत्तापर्यंत सत्तेत राहण्याची सवय होती. ते सत्तेशिवाय राहू शकत नाही आणि म्हणूनच त्यांना ताशेरे ओढण्याशिवाय काही येत नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दोन्ही समाजाचे प्रश्न उत्कृष्टपणे सोडवले आहेत. मात्र शरद पवार राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद जाणीवपूर्वक तयार करत आहेत.’ असा गंभीर आरोप पंकज भोयर यांनी शरद पवारांवर केला आहे. Sharad Pawar

Sharad Pawar is the political ‘daddy’ of the Jarange ; Sadavarte

महत्वाच्या बातम्या