Uddhav Thackeray भाजपमध्ये गेल्यावर साखरसम्राटांचे कर्ज माफ, मग शेतकऱ्यांनीही भाजपमध्ये जायचं का? उध्दव ठाकरे यांचा सवाल

विशेष प्रतिनिधी

मुंबई : शेतकऱ्यांच्या रोज आत्महत्या होत आहेत. कर्ज मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना बैलजोडी, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवावं लागतं. पण साखर सम्राट भाजपमध्ये गेले की त्यांचे शेकडो कोटींचे कर्ज माफ होते. मग साध्या शेतकऱ्यांनी भाजपमध्ये जायचं का, अशीच अपेक्षा आहे का? असा खोचक सवालही त्यांनी केला. Uddhav Thackeray

पत्रकारांशी बाेलताना ठाकरे म्हणाले,पूरग्रस्तांना पक्की घरे बांधून द्या, शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, ज्यांची घरे उध्वस्त झाली त्यांना पक्की घर बांधून दिली गेली पाहिजे, शेतकऱ्यांना एकरी 50 हजार रुपये मदत झालीच पाहिजे. केंद्र सरकारचे पथक अजूनही राज्यात आले नाही. Uddhav Thackeray



ओला दुष्काळ अशी संज्ञा सरकारी कामकाजात नाही, असे जर तुम्ही म्हणत असाल तर तो शब्द काढून टाका. मात्र शेतकऱ्यांना मदत करा

ओला दुष्काळ शब्द नसला तरी जे सत्य आहे, त्याला नाकारता येत नाही. सरकार शेतकऱ्यांना मदत करण्याच्या तयारीत दिसत नाही. पिक विम्याचे पैसे कधीही शेतकऱ्यांना मिळू शकत नाहीत, असे निकष लावण्यात आल्याचा आरोप ठाकरे यांनी केला.
ठाकरे म्हणाले, राज्यातील अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून, शेतातील उभे पीक वाहून गेले आहे. सोयाबीन, कापूस, तूर यांसारखी पिके पूर्णपणे हातातून गेली आहेत. अनेकांच्या संसाराचे सामान पाण्याबरोबर वाहून गेले. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची, त्यांचे कर्ज माफ करण्याची आणि हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत देण्याची द्यावी अशी मागणी आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, मी नुकतीच राज्यभर पाहणी केली, शेतकऱ्यांना भेटलो. त्यांचे हाल ऐकले. सरकारला विनंती केली की राजकारण न करता मार्ग काढावा. पण सरकारची तशी तयारी नाही. मुख्यमंत्री जाहिरातीत व्यस्त आहेत, उपमुख्यमंत्री पाकिटांवर फोटो छापण्यात मग्न आहेत, आणि जनता वाऱ्यावर आहे, असा आरोप करताना विरोधी पक्षनेते असताना फडणवीस यांनी तत्कालीन ठाकरे सरकारला लिहिलेलं पत्रही दाखवलं. त्या पत्रात फडणवीस यांनी ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली होती. याच पत्राचा दाखला देत उद्धव ठाकरे म्हणाले, आज तुम्हीच मुख्यमंत्री आहात, मग हेच निकष लावून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी केली.

should farmers also join BJP? Uddhav Thackeray’s question

महत्वाच्या बातम्या