विशेष प्रतिनिधी
धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील ढोकी पंचायत समिती गणात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमर समुद्रे यांनी केवळ एका मताने विजय मिळविला. भाजप उमेदवार निहाल काझी यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला. Dharashiv
जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणुकीची मतमाेजणी साेमवारी सकाळी सुरू झाली. ढोकी गणात सुरुवातीपासूनच चुरस पाहायला मिळत होती. मतमोजणीच्या अखेरच्या टप्प्यात दोन्ही उमेदवारांच्या हृदयाचे ठोके वाढले होते. मतमोजणीअंती अमर समुद्रे यांना ३१८७ मते मिळाली. भाजपचे उमेदवार निहाल काझी यांना ३१८६ मते मिळाली. ढोकी जिल्हा परिषद गटातून शिवसेना ठाकरे गटाचे तीर्थराज घाडगे यांनी सुमारे १२०० मतांच्या मताधिक्याने विजय मिळविला.
धाराशिव जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे माजी मंत्री राणा जगजितसिंह व शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यात प्रचंड चुरस आहे. त्याचे प्रत्यंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही पाहावयास मिळत आहे.
Thackeray faction wins over BJP by just one vote in Dharashiv’s Dhek Panchayat Samiti constituency
महत्वाच्या बातम्या