विशेष प्रतिनिधी
मुंबई : विधानसभेत मतांची चोरी करून आलेले भाजपा युतीचे हे फिक्सिंग सरकार आहे. मतदारयाद्यांच्या घोटाळ्याची माहिती देण्यासाठी काँग्रेस पक्ष जनजागृती अभियान करणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे.
सपकाळ म्हणाले, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मतदार याद्यांमध्ये गडबड घोटाळा करून भाजपा युतीने निवडणूक आयोगाच्या माध्यमातून विजय मिळवला आहे. या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. परंतु केंद्र सरकार व निवडणूक आयोग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. मतदार याद्यातील घोटाळ्याची माहिती काँग्रेस शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाला मागितली, ते देण्यास टाळाटाळ करत आहेत.
लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेत हा प्रश्न उपस्थित करत चौकशी करण्याची मागणी केली, पण चोराच्या मनात चांदणे याप्रमाणे सरकार चौकशीपासून पळ काढत आहे. म्हणून हा मुद्दा आता जनतेच्या दरबारात घेऊन जाण्याचा निर्णय प्रदेश काँग्रेसने घेतला आहे.
काँग्रेसचे केंद्रीय नेते गुरुदीप सप्पल म्हणाले की, मतदार संख्या वाढीसंदर्भात निवडणूक आयोगाकडे माहिती मागितली, त्यांनी तीन महिन्यांची वेळ मागितली होती. आता पुन्हा तीन महिन्यांची वेळ न्यायालयाकडे मागितली आहे. सिस्टिम फुलप्रुफ आहे, एवढेच निवडणूक आयोग सांगते पण माहिती मात्र देत नाही, असा टोला त्यांनी निवडणूक आयोगाला लगावला. निवडणूक आयोगाकडे सर्व माहिती आहे, केवळ कॉपी पेस्ट करून ती द्यायची आहे, त्यासाठी सहा महिन्यांचा वेळ का लागतो? असा सवाल सप्पल यांनी केला आहे.
The Congress Party will conduct a public awareness campaign to inform about the voter list scam
महत्वाच्या बातम्या
- स्वारगेट बलात्कार घटनेतील आरोपीला फासावर लटकावणार, एकनाथ शिंदे यांची संतप्त प्रतिक्रिया
- स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेच्या गुणाट गावाला पोलीस छावणीचे स्वरूप
- मुंबईतील डिफेन्स क्लबमध्ये ७८ कोटींचा घोटाळा!
- सिल्लोडमध्ये बांग्लादेशी रोहिग्यांना जन्म प्रमाणपत्र देण्याचा घोटाळा, किरीट सोमय्या यांचा आरोप