विशेष प्रतिनिधी
बीड : Dhananjay Munde बीड विषयी वेगवेगळ्या बातम्या पेपरमध्ये वाचत असतो. जिथे तथ्य असेल, तिथे संबंधितांवर कारवाई केली जाईल. पण जिथे तथ्य नाही, तिथे कारवाईचा प्रश्नच नाही, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा मंत्री धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे.Dhananjay Munde
बीड दौऱ्यावर असताना अजित पवार म्हणाले, बीड शहरात मतमोजणीत सुरुवातीला पुढे होते. पण नंतर मागे पडलो जागा गमावली. बाकी पाच ठिकाणी महायुतीच्या जागा निवडून आल्या. त्या भागातील महायुतीच कार्यकर्त्यांच, मतदारांच मनापासून अभिनंदन करतो. शहरात अपयश आलं असलं, तरी अपयशाने खचून जाऊ नका. नव्या उमेदीने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कसं काम करता येईल, लोकांचा विश्वास कसा संपादन करता येईल, त्यासाठी प्रयत्न करा महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं आहे. पाच वर्ष आपल्या हातात आहेत. आपल्याला चांगल्या प्रकारे काम करायचं आहे.
माझी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा दाखला देताना पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धर्मनिरपेक्ष विचारधारेची भूमिका आहे. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राची जी जडण-घडण केली आहे, संस्कृत महाराष्ट्र कसा असावा, वैचारीक बैठक महाराष्ट्राची कशा असावी, महाराष्ट्रात सत्ताधारी लोकांनी कसं काम करावं, याचा आदर्श हा उभ्या देशाला, महाराष्ट्राला चव्हाण साहेबांनी घालून दिला. त्याच मार्गाने पुढे जाण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न आहे.
बाबांनो, माझ्या कामाची पद्धत वेगळी आहे. कुठलीही काम मंजूर झाली, तर ती काम दर्जेदार असली पाहिजेत. कुठलेही वेडेवाकडे प्रकार झाले, तर ते सहन करणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता जवळचा, लांबचा हे बघणार नाही. हा जनतेचा पैसा आहे.आत्ताच काही सहकाऱ्यांना सांगितलं, जनतेचा पैसा सत्कारणी लागला पाहिजे. त्यात कुठलीही गडबड होता कामा नये. कारण मर्यादीत प्रमाणात पैसा मिळतो. केंद्रातून निधी कसा आणता येईल, त्यासाठी प्रयत्न करु. डीपीडीसीच्या माध्यमातून सर्वसामान्याचे प्रश्न कसे सोडवता येतील, त्यासाठी प्रयत्न करु. तुमच्याकडून कुठलीही चूक होता कामा नये, असे आवाहन अजित पवार यांनी केले.
There is no question of action, Dhananjay Munde is once again supported by Ajit Pawar
महत्वाच्या बातम्या
- Chandrasekhar Bawankule : राज्यात वाळू माफियांना पायबंद घालू, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा
- मनोज जरांगे उपोषण सोडणार, वेगळ्या मार्गाने आंदोलनाचा इशारा
- Neelam Gorhe : संयुक्त महाराष्ट्राबाबत राज्य सरकारच्या भावना जाज्वल्य, डॉ. नीलम गोऱ्हे यांचे ठाम प्रतिपादन
- Nitesh Rane : महाराष्ट्रातही बुरख्याचा वाद, नितेश राणे यांनी केली ही मागणी