विशेष प्रतिनिधी
बुलढाणा : Supriya Sule अलीकडेच खासदार सुप्रिया सुळे यांनी आर्थिक मागासलेपणावर आरक्षण असावं असं वक्तव्य केलं. मात्र आता यावर ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी त्यांच नाव न घेताच त्यांना टोला लगावला आहे. ‘सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या ताईंना सामाजिक मागासलेपण काय कळणार?’ असे म्हणत त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे.
‘आरक्षणविरोधी बोलणाऱ्या ताई सोन्या-चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आल्या आहेत. त्यांना काय कळणार दलित, आदिवासी घटकांचे सामाजिक मागासलेपण? फुले, शाहू, डॉ. आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात आरक्षण नाकरणाऱ्या प्रवृत्ती जन्माला आल्या याची आम्हाला लाज का वाटू नये?’ असा सवालही त्यांनी केला आहे. तसेच, ‘आर्थिक निकशावरील आरक्षण ही संघ आणि भाजपाची भाषा आहे. आरक्षणवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांना ही आरक्षणाची व्याख्या मान्य आहे का?’ असं म्हणत त्यांनी आव्हाड यांनी देखील प्रश्न केला आहे आणि गुलामी सोडून त्यांनी यावर भाष्य करायला हवं असा सल्ला देखील त्यांनी आव्हाड यांना दिला आहे. Supriya Sule
मराठा आरक्षणाची चर्चा सुरू म्हणून आरक्षणच नाकारणार?
शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे नुकतेच चिंतन शिबिर पार पडले. या शिबिरात खासदार सुप्रिया सुळे यांनी देशात आर्थिक मागासलेपणावर आरक्षण द्याव अशी भूमिका मांडली. मात्र यालातीव्र विरोध करत पॅंथर सेनेचे दीपक केदार यांनी त्यांच्यावर अत्यंत खोचक अशी टीका केली. ‘बापाच्या घराणेशाहीचे आरक्षण हेच अस्तित्व असणारे काय बोलताय? तुम्ही काय बिहार निवडणुकीत मनुवादी बी टीम म्हणून काम करताय का?’ असा सवाल केदार यांनी केला. सोबतच, मराठा आरक्षणाची चर्चा सुरू आहे. म्हणून आरक्षणच नाकारताय? हे योग्य नाही. आता पुरोगामी विचारधारेचे मनुवादी विचारसरणीचे झाले आहेत. तुम्ही माफी मग नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा ऑल इंडिया पॅंथर सेनेचे दीपक केदार यांनी सुप्रिया सुळेंना दिला आहे. Supriya Sule
या संपूर्ण प्रकरणात केदार यांनी जरी कोणाचे नाव घेतले नसले तरी ते कोणाविषयी बोलत होते हे मात्र अगदी स्पष्ट होतं. या संपूर्ण प्रकरणाबद्दल सुळेंनी माफी मागावी आणि मागासलेपणावरच आरक्षणाची बाजू लावून धरावी, अशी स्पष्ट आणि ठाम भूमिका केदार यांनी घेतली आहे. तसेच माफी न मागितल्यास आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा देखील दिला आहे. Supriya Sule