Chandrashekhar Bawankule : पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात काम करणाऱ्यांना बाहेरचा रस्ता, चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा

विशेष प्रतिनिधी

परभणी:  Chandrashekhar Bawankule  पक्षाशी विश्वासघात करणे म्हणजे स्वतःच्या आईशी विश्वासघात करण्यासारखे आहे. जे कोणी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात काम करतील, त्यांना तत्काळ ‘घरचा रस्ता’ दाखवला जाईल, असा इशारा भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बंडखोरांना दिला. Chandrashekhar Bawankule

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकाच दिवसात पाच जाहीर सभा घेतल्या. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी पक्षांतर्गत बंडाळी आणि शिस्तभंगाबाबत अत्यंत कडक भूमिका मांडली. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचीही प्रमुख उपस्थिती होती. या दौऱ्यात प्रामुख्याने जिंतूर तालुक्यातील इटोली, झरी, दैठणा, महातपुरी आणि वडगाव या पाच ठिकाणी सभांचे आयोजन करून त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधला. Chandrashekhar Bawankule



या जाहीर सभांमधून बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या सर्व उमेदवारांना विकासाच्या मुद्द्यावर भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन जनतेला केले. मात्र, त्याच वेळी त्यांनी पक्षांतर्गत शिस्तीबाबत अत्यंत कडक संकेत दिले. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात छुप्या किंवा उघडपणे काम करणाऱ्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना कोणत्याही परिस्थितीत माफी मिळणार नाही, त्यांना थेट ‘घरचा रस्ता’ दाखवला जाईल, असा सज्जड इशारा त्यांनी दिला. बावनकुळे यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून बंडखोरांचे धाबे दणाणले आहेत.

Work Against Party Candidates and You’re Out, Warns Chandrashekhar Bawankule

महत्वाच्या बातम्या