विशेष प्रतिनिधी
पुणे : शिवशाही बसमध्ये बलात्काराची घटना घडली त्यात कुठेही पीडितेकडून प्रतिकार झाला नाही. बसच्या आजूबाजूला काही लोक उभे होते. पण प्रतिकार न झाल्यामुळे याबाबत कुणाला शंका आली नाही,या गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या विधानावर संताप व्यक्त होत आहे. त्यांचा राजीनामा घेण्याची मागणीही होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सुनावले आहे. अशा प्रकरणात अधिक संवेदनशील राहून बोलावे लागेल, असा सल्ला दिला आहे.
पुण्यातील स्वारगेट बस आगारात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला. योगेश कदम यांनी याबाबत असंवेदनशील विधान केल्याचा आरोप होत आहे. शिवशाही बसमध्ये जी घटना घडली त्यात कुठेही पीडितेकडून प्रतिकार झाला नाही. त्यावेळी बसच्या आजूबाजूला काही लोक उभे होते. पण प्रतिकार न झाल्यामुळे याबाबत कुणाला शंका आली नाही, असे विधान गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केले होते.
यावर फडणवीस म्हणाले, योगेश कदम यांच्या विधानाला वेगळ्या पद्धतीने घेतले गेले. स्वारगेट आगार हा गर्दीचा परिसर आहे. तिथे अनेक लोक होते. गुन्हा घडलेली बस बाहेरच होती. पण लोकांना प्रतिकार होताना लक्षात आला नाही, असे सांगण्याचा योगेश कदम यांचा प्रयत्न होता. तथापि, कदम नवीन मंत्री आहेत. त्यामुळे माझ्या त्यांना सल्ला असेल की, अशा प्रकरणात बोलताना आपल्याला अधिक संवेदनशील राहून बोलावे लागेल. कारण बोलताना काही चूक झाली तर त्याचा समाजमनावर चुकीचा परिणाम होतो.
आरोपीच्या अटकेबाबत फडणवीस म्हणाले की, आरोपी लपून बसला होता. मात्र पोलिसांनी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून त्याला शोधून काढले. लवकरच या संपूर्ण घटनेचा उलगडा होईल. पोलीस आयुक्तांनी या घटनेबाबत काही माहिती दिली आहे. उर्वरित माहिती या टप्प्यावर देणे योग्य होणार नाही. संपूर्ण तपास झाल्यानंतर सर्व माहिती मिळेल.
दरम्यान, योगेश कांदा यांच्यावर विरोधकांकडून टीका होत असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. खासदार संजय राऊत यांनी कदम हे दिव्य मंत्री आहेत. त्यांना आरोपीला वाचवायचे आहे का असा सवाल केला. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी फडणवीस यांनी कदम यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली आहे.
You have to speak more sensitively, said the Chief Minister to the Minister of State for Home Yogesh Kadam
महत्वाच्या बातम्या
- स्वारगेट बलात्कार घटनेतील आरोपीला फासावर लटकावणार, एकनाथ शिंदे यांची संतप्त प्रतिक्रिया
- स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेच्या गुणाट गावाला पोलीस छावणीचे स्वरूप
- मुंबईतील डिफेन्स क्लबमध्ये ७८ कोटींचा घोटाळा!
- सिल्लोडमध्ये बांग्लादेशी रोहिग्यांना जन्म प्रमाणपत्र देण्याचा घोटाळा, किरीट सोमय्या यांचा आरोप