विशेष प्रतिनिधी
पुणे : रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांना काही कीटकनाशक कंपन्या आणि त्यांच्या अधिकृत विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना चुकीची किंवा भेसळयुक्त औषधे दिल्याचे समोर आले आहे. त्याबरोबरच अनेक कंपन्यांनी औषधांच्या विक्रीचे दर वेगवेगळे लावून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक केल्याने संबंधित औषध कंपन्यावर कारवाई करावी व शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी ९ एप्रिल रोजी सकाळी १२ वाजता कृषी आयुक्त कार्यालय पुणे येथे राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली आहे.
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदार शेतकरी अस्मानी व सुल्तानी संकटात सापडला असताना अनेक औषध कंपन्यांनी शेतकऱ्यांनी रोखीने खते व किटकनाशके घेतल्यास एमआरपी किमतीच्या ५० टक्के सवलत देवून औषधे विक्री करत आहेत. यामुळे स्थानिक दुकानदार व औषध कंपन्या यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात नफा मिळवून आंबा बागायतदार शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करत आहेत.
यामध्ये सध्या स्थितीत सिंजेंटा , बायर , ॲडव्हॅान्स , युपीएल , लक्ष्मी ॲग्रो , जीएमपी , सुमीतमो , सुमील , धानोका , विलवुड , टॅापीका , नागार्जुना , स्वॅल , पेस्टीजन ॲग्रो , साहिब पेस्टीसाईड , अनु क्रो सायन्स , जेयु ॲग्रो , पोलन ॲग्रो , निसर्ग ॲग्रो , वल्लभ पेस्टीसाईड यासारख्या शेकडो कंपन्यांनी आंबा बागायतदार यांना औषध पुरवठा केलेला आहे.
वरील सर्व कंपन्यांचे प्रतिनिधी , विभागीय कृषी सहसंचालक कोकण , रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कृषी अधिक्षक त्याबरोबरच या व्यतिरिक्त ज्या कंपन्यांनी औषध विक्री केलेली आहेत अशा सर्व औषध कंपनीच्या संबंधित जबाबदार लोकांना बैठकीस निमंत्रित करण्यात आले आहे.या बैठकीस मा. आमदार बाळा माने ,मा. आमदार वैभव नाईक , सिंधुदुर्ग,रत्नागिरी , रायगड , पालघर जिल्ह्यातील आंबा काजू बागायतदार व व्यापारी महासंघाचे पदाधिकारी काका ढोके , किरण टेंभुलकर , गणेश गायकर , तुषार पालेकर , प्रशांत शिंदे , जि. प. सदस्य संजय गावडे , पिंटू गावडे , यांच्यासह शेतकरी या बैठकीस उपस्थित राहणार आहेत.
Adulterated Pesticides Hit Mango Growers; Raju Shetti Demands Compensation
महत्वाच्या बातम्या
- Mandatory PNG Shift : सुविधेच्या ठिकाणी पीएनजी जोडणी घ्यावीच लागणार; एलपीजीवरील ताण कमी करण्यासाठी निर्णय
- देशात अनेक शहरांमध्ये इंधनासाठी रांगा; पण प्रत्यक्षात देशात इंधनाचा पुरेसा साठा; मोदी सरकारचा खुलासा
- Amid West Asia : एप्रिलमध्ये रशियाकडून 6 कोटी बॅरल कच्चे तेल खरेदी करेल भारत; सवलतीऐवजी प्रीमियमवर मिळेल
- कुटुंब टिकले तरच धर्म आणि राष्ट्र टिकेल, समाज सुरक्षित राहील; पुण्यातल्या कोथरूड मधल्या विराट संमेलनात एकमुखी सूर