भाजप–शिवसेनेचा मुंबई महापालिकेसाठी फॉर्म्युला अंतिम, भाजप १३७ तर शिंदे गटाची शिवसेना ९० जागांवर लढणार

विशेष प्रतिनिधी

मुंबई : अनेक दिवसांच्या चर्चेनंतर आणि तणावपूर्ण वाटाघाटीनंतर अखेर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुतीतील भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील जागावाटपाचा तिढा सुटला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसाच्या अवघ्या एक दिवस आधी हा फॉर्म्युला अंतिम करण्यात आला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी झालेल्या तब्बल पाच तास चाललेल्या हाय व्होल्टेज बैठकीनंतर दोन्ही पक्षांनी २२७ जागांचे अंतिम वाटप निश्चित केले. त्यानुसार भाजप १३७ जागांवर, तर शिवसेना (शिंदे गट) ९० जागांवर निवडणूक लढवणार आहे. भाजप आपल्या कोट्यातील काही जागा मित्रपक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) ला देणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.



सूत्रांच्या माहितीनुसार, याआधी २०७ जागांवर दोन्ही पक्षांमध्ये सहमती झाली होती. मात्र उर्वरित २० जागांवरून वाद निर्माण झाला होता. या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये दीर्घ चर्चा झाली आणि अखेर सर्व जागांवर एकमत झाले.

बैठकीनंतर मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आणि शिवसेना नेते राहुल शेवाळे यांनी संयुक्तपणे माध्यमांशी संवाद साधत महायुती एकसंघपणे निवडणुकीला सामोरे जाणार

BJP–Shiv Sena Finalise BMC Formula; BJP to Contest 137 Seats, Shinde-Led Sena 90

महत्वाच्या बातम्या