विशेष प्रतिनिधी
मुंबई : Uddhav Thackeray राज्य सरकारने सादर केलेल्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र टीका केली आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती सर्वांनाच माहीत असताना हा अर्थसंकल्प म्हणजे कर्ज काढून फटाके वाजवण्यासारखा असल्याचे त्यांनी म्हटले. हा अर्थसंकल्प केवळ विकासाचे मृगजळ दाखवणारा असून सर्वसामान्यांच्या आयुष्यात यातून काय बदल होणार आहे, हे लवकरच स्पष्ट होईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी शुक्रवारी दिली. Uddhav Thackeray
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा उल्लेख केला असला, तरी प्रत्यक्षात सातबारा कोरा करण्याचे आश्वासन पूर्ण झालेले नाही, अशी टीकाही ठाकरे यांनी केली. पाच वर्षांपूर्वी महाविकास आघाडी सरकारच्या काळात कालबद्ध पद्धतीने शेतकऱ्यांची दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमुक्ती करण्यात आली होती. त्या वेळी पात्र-अपात्र अशा अटी न घालता शेतकऱ्यांना सरसकट दिलासा देण्यात आला होता, असेही त्यांनी नमूद केले. Uddhav Thackeray
त्यावेळी कोरोना महामारी आली आणि परिस्थिती बदलली. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांची प्रोत्साहनपर मदत देण्यास सुरुवात केली होती. मात्र त्याच दरम्यान आमचे सरकार पाडण्यात आले, असा आरोपही ठाकरे यांनी केला. Uddhav Thackeray
शेतकऱ्यांचे खरोखर भले करायचे असेल, तर पात्र-अपात्र असा शब्दांचा खेळ न करता कर्जमाफी कोणत्या तारखेपर्यंत पूर्ण करणार हे सरकारने स्पष्ट सांगावे, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, अर्थसंकल्पात केवळ मोठमोठे आकडे आणि पोकळ घोषणा असल्याचा आरोपही त्यांनी केला. राज्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला असून सुमारे ४० हजार कोटी रुपयांच्या तुटीचा हा अर्थसंकल्प महाराष्ट्राला दिवाळखोरीकडे नेणारा आहे, अशी टीका त्यांनी केली.
अर्थसंकल्पात बुलेट ट्रेन, मेट्रो, भुयारी मार्ग यांसारख्या मोठ्या प्रकल्पांवर भर देण्यात आला आहे; मात्र गावखेड्यातील गरीब, आदिवासी, कष्टकरी, महिला, बेरोजगार आणि तरुणांसाठी ठोस योजना नसल्याचा आरोप त्यांनी केला. कंत्राटदारांसाठी मात्र मोठ्या योजना राबवल्या जात असल्याची टीकाही त्यांनी केली.
याशिवाय ‘लाडकी बहिण’ योजनेअंतर्गत महिलांना दरमहा २१०० रुपये देण्याचा उल्लेख अर्थसंकल्पात कुठेही दिसत नाही, असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला. जाहीर केलेल्या योजनांसाठी निधी कुठून आणणार, याबाबतही सरकारने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी त्यांनी केली.
एकूणच हा अर्थसंकल्प आकड्यांची फेकाफेक आणि जनतेच्या डोळ्यांत धूळफेक करणारा असल्याची टीका करत, २०४७ पर्यंतचे मोठे स्वप्न दाखवण्यापेक्षा आजच्या समस्यांवर सरकारने उत्तर द्यावे, असे ठाकरे यांनी म्हटले.
Budget Is ‘Fireworks Funded by Borrowed Money’, Says Uddhav Thackeray
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadanvis : राज्याची अर्थव्यवस्था 2047 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलर्सवर नेणार; मुख्यमंत्र्यांचा विश्वास
- Kalakar Katta : गुडलक चौकातील ‘कलाकार कट्टा’ वादात नवे वळण; वाहतूक अडथळ्याची अधिकृत नोंदच नाही
- उद्योगपती अनिल अंबानीच्या संबंधित कंपनीवर 15 ठिकाणी ईडीचे छापेमारी
- साेशल मीडियावर व्हायरल वक्तव्य प्रकरणी वसंत माेरे यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा