विशेष प्रतिनिधी
मुंबई : Chief Minister राज्य सरकारने २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात मुंबई महानगर प्रदेशाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे निश्चित केली आहेत. त्यानुसार पुढील चार वर्षांत, म्हणजेच सन २०३० पर्यंत मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था सध्याच्या सुमारे १४० अब्ज डॉलरवरून ३०० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना याची माहिती दिली.Chief Minister
या उद्दिष्टपूर्तीसाठी उद्योग, पायाभूत सुविधा, गृहनिर्माण आणि वाहतूक क्षेत्रात अनेक मोठे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. मुंबईच्या आर्थिक वाढीस चालना देण्यासाठी वडाळा येथे सुमारे १३० एकर जागेवर जागतिक दर्जाचे स्टार्ट-अप आणि इनोव्हेशन हब उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या हबमुळे नवउद्योगांना प्रोत्साहन मिळून मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.Chief Minister
याशिवाय मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत ठाणे ते तलासरी दरम्यानची तीन स्थानके फेब्रुवारी २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पामुळे विरार, बोईसर आणि ठाणे परिसरात आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल. स्थानक परिसरांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी स्वतंत्र आराखडा तयार करण्यात येणार आहे.
तसेच शिवडी-न्हावा शेवा अटल सेत परिसरात ‘तिसरी मुंबई’ म्हणजेच मुंबई ३.० विकसित करण्याची योजना आखण्यात आली आहे. कर्नाळा-साई-चिरनेर, रायगड-पेण तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अधिसूचित क्षेत्राला ‘ग्रीनफिल्ड विकास केंद्र’ म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यासोबतच पालघर जिल्ह्यातील वाढवण येथे ‘चौथी मुंबई’ विकसित करण्याचे नियोजन असून या भागात लॉजिस्टिक्स आणि वेअरहाऊसिंगसाठी मोठे विकास केंद्र उभारले जाणार आहे. या प्रकल्पांमुळे मुंबई महानगर प्रदेशाच्या आर्थिक विकासाला नवी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
Target Set to Boost Mumbai Metropolitan Economy to $300 Billion, Says Chief Minister
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadanvis : राज्याची अर्थव्यवस्था 2047 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलर्सवर नेणार; मुख्यमंत्र्यांचा विश्वास
- Kalakar Katta : गुडलक चौकातील ‘कलाकार कट्टा’ वादात नवे वळण; वाहतूक अडथळ्याची अधिकृत नोंदच नाही
- उद्योगपती अनिल अंबानीच्या संबंधित कंपनीवर 15 ठिकाणी ईडीचे छापेमारी
- साेशल मीडियावर व्हायरल वक्तव्य प्रकरणी वसंत माेरे यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा