विशेष प्रतिनिधी
मुंबई : Supriya Sule दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस महापालिका निवडणुकीत एकत्र आल्याने राष्ट्रवादी एकत्र आल्याने राष्ट्रवादीचा शरद पवार गट राष्ट्रीय लोकशाही आघाडीत म्हणजे एनडीएमध्ये सहभागी होणार आणि खासदार सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र यावर सुप्रिया सुळे यांनी चक्क आपल्यालाच माहिती नाही असे उत्तर दिले आहे.Supriya Sule
महापालिकेच्या निवडणुकीनंतर शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएबरोबर जाईल का? तसेच सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होतील आणि रोहित पवार राज्यात मंत्री होतील अशा चर्चा सुरू आहेत, यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, या चर्चा मी व्हॉट्सअप ग्रुपवर वाचल्या आहेत. मात्र, मी त्या चर्चांवर फार विचार करत नाही. जे माझ्या कामाच्या बाहेर आहे, त्याचा विचार मी कशाला करू? मी वास्तवात जगत असते. एका सशक्त लोकशाहीमध्ये लोकांना मत मांडण्याचा अधिकार आहे, त्यामुळे लोक वेगवेगळ्या माध्यमातून मते मांडत असतात. लोक काय बोलतात, लोक पक्षाबाबत काय बोलतात, कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत, या ऐकून घ्यायच्या असतात, असे सुळे म्हणाल्या.Supriya Sule
सुप्रिया सुळे या केंद्रात मंत्री होणार अशा देखील चर्चा सुरू असतात, यावर काय सांगाल? असा प्रश्न विचारला असता, सुप्रिया सुळे म्हणाल्या, याचे उत्तर माझ्याकडे नाही. मात्र, 11 वर्षांपासून मी चर्चा ऐकते. लोक बोलत असतात, पण आपण आपले काम करत राहायचे. बारामतीच्या लोकांनी खूप विश्वासाच्या नात्यांनी मला निवडून दिले आहे. त्यामुळे माझी पहिली जबाबदारी माझ्या मतदारसंघातील मूलभूत सुविधा सोडवणे आहे. लोकांनी मला ज्या कामांसाठी दिल्लीत पाठवले ते काम मी पूर्ण केले पाहिजे, ते काम करण्याचा मी प्रयत्न करत आहे, असे सुळे यांनी म्हटले.
कार्यकर्त्यांची इच्छा, जे निवडणूक लढवणारे कार्यकर्ते होते, त्यातील बऱ्याच कार्यकर्त्यांची ही इच्छा होती आणि ते एक टीमवर्क होते. याच टीमवर्कच्या माध्यमातून दोन्ही राष्ट्रवादीची युती झाली, असेही सुळे यांनी सांगितले.
Will She Join the Union Cabinet? Supriya Sule Says, “Even I Don’t Know”
महत्वाच्या बातम्या
- Election Commission : जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आयोगाने बोलावली बैठक, मतदानाची तारीख निश्चित होणार
- विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर आचार संहिता भंगाचा गुन्हा दाखल करा, हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी
- शिंदे गटाकडून १५० ठिकाणी एबी फॉर्म, पुण्यात भाजप–शिवसेना युती तुटल्याचे स्पष्ट संकेत
- संभाजीराजांबद्दल बदनामीकारक लिखाण झाले असेल तर सुधारेन, विश्वास पाटील यांचे आश्वासन