Abhijeet Dipke : अभिजीत दिपके यांचे इन्स्टाग्राम अकाउंट सायबर हल्लेखोरांच्या ताब्यात, बॅकअप अकाउंटही मेटाकडून हटवले

विशेष प्रतिनिधी

पुणे : Abhijeet Dipke  सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या उपरोधिक शैलीतील राजकीय आणि सामाजिक व्यंगात्मक पोस्टमुळे लोकप्रिय ठरलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) या पेजच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. या पेजचे संस्थापक अभिजीत दिपके यांचे अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याची माहिती त्यांनी स्वतः सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वरून दिली आहे.Abhijeet Dipke

अभिजीत दिपके यांचे मुख्य इन्स्टाग्राम अकाउंट सायबर हल्लेखोरांच्या ताब्यात गेल्याने ‘कॉकरोच जनता पार्टी’ पेजवरील नियंत्रणही त्यांच्या हातातून निसटले आहे. हे पेज आपल्या आक्रमक राजकीय व्यंगचित्रे, सामाजिक भाष्य आणि सध्याच्या घडामोडींवरील उपरोधिक कंटेन्टमुळे विशेष चर्चेत असते. त्यामुळे या घटनेनंतर त्यांच्या फॉलोअर्समध्ये मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.Abhijeet Dipke



दिपके यांनी सांगितले की, मुख्य अकाउंट हॅक झाल्यानंतर चाहत्यांशी संपर्क कायम ठेवण्यासाठी त्यांनी एक बॅकअप अकाउंट सुरू केले होते. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे मेटा कंपनीने ते बॅकअप अकाउंटदेखील टेकडाउन केले. त्यामुळे सध्या त्यांच्या दोन्ही अकाउंट्सवर प्रवेश उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे.

सायबर हल्ल्यानंतर अभिजीत दिपके यांनी इन्स्टाग्राम आणि मेटाच्या तांत्रिक विभागाशी संपर्क साधला असून, मूळ अकाउंट परत मिळवण्यासाठी आवश्यक कायदेशीर आणि तांत्रिक प्रक्रिया सुरू केल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आपल्या फॉलोअर्सना कोणत्याही संशयास्पद लिंक किंवा मेसेजपासून सावध राहण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

Abhijeet Dipke’s Instagram account hacked; backup account also removed by

महत्वाच्या बातम्या