अहिल्यानगर विधानपरिषद रणधुमाळी; भाजपाकडून संदीप कोतकर यांचे नाव आघाडीवर?

विशेष प्रतिनिधी

 

अहिल्यानगर: जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था परिषद निवडणुकीचे रणधुमाळी सुरू झाली आहे.अहिल्यानगर मतदारसंघातून भाजपाकडून माजी महापौर संदीप कोतकर यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत कोतकरांची बैठक झाली असून, त्यांच्या भाजपा प्रवेशाला हिरवा कंदील मिळाला असल्याचे बोलले जात आहे.केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत शनिवारी कोतकर प्रवेश करणार असल्याचा चर्चा सुरू आहेत.

मागील चार वर्षांपासून रिक्त असलेल्या या जागेसाठी जिह्यातील अनेक इच्छुक मैदानात उतरले आहेत.दिवंगत माजी मदर अरुण जगतो यांनी सलग दोन वेळा विधान परिषदेत जिल्ह्याचे नेतृत्व केले होते. विधान परिषदेच्या निवडणुकीची घोषणा होतात इच्छुकांनी पुन्हा एकदा मोर्चे बांधणी सुरू केली आहे.



कुणाची नावे चर्चेत?

विधानपरिषदेच्या शर्यतीत माजी आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार संग्राम जगताप यांचे बंधू आणि माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप, माजी आमदार चंद्रशेखर घुले तसेच माजी महापौर संदीप कोतकर यांची नावे चर्चेत आहेत.

अहिल्यानगरमधील भाजपा नेतृत्वाला स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारांवर प्रभाव टाकू शकणारा, आर्थिक दृष्ट सक्षम आणि संघटनात्मक ताकद असलेला उमेदवार हवा असल्याचे बोलले जात आहे. संदीप कोतकर यांच्याकडे ही ताकत असल्यामुळेच वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्यासोबत प्राथमिक चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे.

तर दुसरीकडे, राहुल पोटनिवडणुकीत माजी आमदार अशक्त तनपुरे यांनी घेतलेल्या माघारीमुळे भाजपचे अक्षय कर्डिले यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला होता. त्या जगाची परतफेड म्हणून प्राजक्त तनपुरे यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्याचा पर्याय भाजप समोर असल्याची चर्चा आहे.

Ahilyanagar Legislative Council election: Sandeep Kotkar’s name in the lead from BJP?

महत्वाच्या बातम्या