बारामतीला पावसाचा फटका; शेतकऱ्यांचे नुकसान; जय पवार थेट बांधावर!

विशेष प्रतिनिधी

पुणे – तालुक्यासह परिसरातील ग्रामीण भागात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक झालेल्या या पावसाने उभ्या पिकांवर पाणी साचल्याने तसेच वाऱ्याच्या तडाख्यामुळे अनेक शेतकऱ्यांची मेहनत अक्षरशः पाण्यात गेली आहे. विशेषतः भाजीपाला, फळबागा आणि हंगामी पिकांना मोठा फटका बसल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. Baramati

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते जय पवार यांनी तातडीने परिस्थितीचा आढावा घेत बाधित गावांना भेट दिली. त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. यावेळी अनेक ठिकाणी पिके आडवी झालेली, फळझाडांची पडझड झालेली तसेच पाण्याखाली गेलेली शेती त्यांनी प्रत्यक्ष पाहिली.



यावेळी जय पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. अनेक शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपण, उत्पादन खर्च आणि नैसर्गिक आपत्तीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाची व्यथा मांडली. काही शेतकऱ्यांनी विमा दाव्यांबाबत अडचणी असल्याचेही सांगितले.

या संदर्भात बोलताना जय पवार यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांचे झालेले नुकसान गंभीर असून प्रशासनाने तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले जातील. कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेतली जाईल.” त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून नुकसानग्रस्त क्षेत्रांची नोंद करण्याचे निर्देश दिल्याची माहिती दिली.

तसेच, राज्य सरकारच्या पातळीवरही हा प्रश्न गांभीर्याने मांडला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. “उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. गरज पडल्यास विशेष पॅकेजची मागणीही केली जाईल,” असे त्यांनी यावेळी सांगितले.

Baramati hit by rain; farmers suffer losses; Jai Pawar directly on the dam!