विशेष प्रतिनिधी
पुणे: Hanumant Pawar पुण्यात सोमवारी संध्याकाळी काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांना हिंदुत्ववादी कार्यकर्ते तुषार दामगुडे आणि त्यांच्या साथीदारांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, मारहाणीदरम्यान दामगुडे यांनी आपल्याला पिस्तुल दाखवून धमकावल्याचा आरोप पवार यांनी केला आहे.Hanumant Pawar
पुण्यात सोमवारी ‘पुढारी न्यूज’च्या ‘धुरळा’ या चर्चासत्रात ‘शिवरायांचा अवमान, मराठी अस्मिता गपगुमान’ या विषयावर झालेल्या चर्चेनंतर, काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते तुषार दामगुडे यांच्यात कार्यालयाबाहेर जोरदार शाब्दिक वाद झाला. या वादाचे रूपांतर पुढे हाणामारीत झाले असून, तुषार दामगुडे आणि त्यांच्या 3-4 साथीदारांनी हनुमंत पवार यांना मारहाण केल्याचे समोर आले आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्यामध्ये दामगुडे यांनीच सुरुवातीला हात उगारल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.Hanumant Pawar
मारहाणीच्या घटनेनंतर हनुमंत पवार म्हणाले, कार्यक्रम संपल्यावर मी कार्यालयातून बाहेर पडत होतो. यादरम्यान गेटबाहेर थांबलेल्या दामगुडे आणि त्यांच्या साथीदारांनी मला शिवीगाळ करुन बोलावले आणि तू भाजप- संघाला विरोध का करतो, हर्षवर्धन सपकाळ यांची बाजू का घेतो, असा जाब विचारत तुषार दामगुडेंनी मला पिस्तुल दाखवले. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले.
Congress Spokesperson Hanumant Pawar Assaulted; Hindutva Activists
महत्वाच्या बातम्या
- शक्तीपीठ महामार्ग विरोधातील आंदोलन तीव्र करणार, राजू शेट्टी यांचा इशारा
- Rahul Gandhi राहुल गांधी यांची भिवंडी न्यायालयात हजेरी; भाजपने ठाण्यात दाखवले काळे झेंडे
- Bhiwgan Case : भिगवण प्रकरणातील तरुणीची सुधार गृहात रवानगी
- Muslim Reservation : मुस्लिम समाजाच्या आरक्षण रद्द विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका