विशेष प्रतिनिधी
पुणे: देशात खळबळ उडवून देणाऱ्या ‘ नीट – यूजी २०२६ ‘ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातून अजून एक अटक करण्यात आली आहे.पुण्यातून भौतिकशास्त्र विषयाच्या तज्ञ असलेल्या मनीषा संजय हवालदार यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. मनिषा हवालदार या पुण्यातील शेठ हिरालाल सराफ प्रशाला या शाळेच्या मुख्याध्यापिका असून, ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ कडून त्यांची परीक्षेसाठी ‘फिजिक्स एक्सपर्ट’ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. सीबीआयकडून करण्यात आलेल्या तपासात मनीषा हवालदार यांनी पदाचा गैरवापर करत नीट परीक्षेतील बहुतेक शास्त्राचे प्रश्न आधीच फोडल्याचे केल्याचे उघड झाले आहे.
कोण आहेत मनिषा हवालदार?
58 वर्षीय मनीषा हवलदार गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. पुण्यातील बुधवार पेठ परिसरातील शेठ हिरालाल सराफ प्रशाले त्या मुख्याध्यापिका म्हणून जबाबदारी सांभाळत होत्या. महत्वाचे म्हणजे, येत्या 30 जून 2026 रोजी त्या सेवानिवृत्त देखील होणार होत्या. मात्र निवृत्ती पूर्वीच त्यांचे नाव देशातील सर्वात मोठ्या परीक्षा घोटाळ्या पैकी एका प्रकरणात समोर आल्याने मोठी चर्चा सुरू झाली आहे. ‘ एनटीए ‘ नियुक्त तज्ञ म्हणून हवालदार यांच्याकडे प्रश्नपत्रिका तयार करण्याची संबंधित गोपनीय माहिती आणि प्रश्नांचा थेट एक्सेस होता. याच अधिकाराचा गैरवापर करून त्यांनी एप्रिल महिन्यात नीट परीक्षेतील भौतिकशास्त्र विषयातील काही प्रश्न आरोपी मनीषा मांढरे यांच्याकडे पाठवले होते.
सीबीआयकडून करण्यात आलेल्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. ३ मे रोजी झालेल्या ‘ नीट- यूजी ‘ परीक्षेतील भौतिकशास्त्राचे प्रश्नपत्रिकातील प्रश्न जुळत झाल्याच्या आता स्पष्ट झाले आहे. तपास अधिकाऱ्यांकडून तांत्रिक पुरावे, मोबाईल डेटा, चॅट्स आणि डिजिटल व्यवहारांचा आजारावर मनीषा हवालदार यांना अटक करण्यात आली.
मनिषा हवालदार निलंबित..
मनिषा हवालदार यांच्या अटकेनंतर शाळा स्थापना कडून तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत मनिषा हवालदार यांना निलंबीत करण्याचा निर्णय शाळा व्यवस्थापनाकडून घेण्यात आला आहे.
Direct access and misuse of question paper; Who exactly is Manisha Havaldar?
महत्वाच्या बातम्या
- High Court : जनावरांच्या कत्तल निर्बंधांवर स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार
- Rohit Pawar : “भाजपसोबत जाणार नाही”; रोहित पवारांच्या विधानाने राष्ट्रवादीत नव्या चर्चांना उधाण
- ‘नीट’चा पेपर कसा फोडला, ते ही पुरावा न सोडता; चौकशीसाठी पोलिसांनी गाठलं मांढरेंचं कॉलेज! तपासात काय सापडलं पाहा!
- शेतकऱ्यांना कर्जवाटप वाढवा, सीबीलमुळे कुणालाही रोखू नका; मुख्यमंत्री फडणवीसांचे बँकांना निर्देश