विशेष प्रतिनिधी
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या लिअरजेट ४५ ( Learjet 45) विमान अपघाताच्या तपासाला वेग आला असून, दुर्घटनेनंतर विमानाचा ब्लॅक बॉक्स शोधून काढण्यात तपास यंत्रणांना यश आले आहे. यामुळे अपघातामागील निश्चित कारण समजू शकणार आहे.
Ajit Pawar exit : एक दमदार आणि दिलदार मित्र गमावला; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भावना!!
बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता एअरपोर्ट अथॉरिटी, पोलिस फॉरेन्सिक पथक, डीजीसीए आणि एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) यांच्या विशेष टीमने घटनास्थळी दाखल होत तांत्रिक तपास सुरू केला. फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर असलेला ब्लॅक बॉक्स ताब्यात घेण्यात आला असून, त्यातून अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हा भीषण अपघात बुधवारी सकाळी सुमारे 8.45 वाजता घडला. दिल्लीस्थित व्हीएसआर व्हेंचर्स ( VSR Ventures)कंपनीद्वारे चालवले जाणारे Learjet 45 विमान बारामती विमानतळावर उतरण्याचा दुसरा प्रयत्न करत असताना धावपट्टीच्या बर्याच आधी कोसळले
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने जाहीर केलेल्या अधिकृत माहितीनुसार, विमानाने सकाळी 8.18 वाजता बारामती विमानतळाशी संपर्क साधला होता. त्या वेळी वैमानिकांना हवामानाची माहिती देण्यात आली आणि लँडिंग ‘पायलटच्या निर्णयावर’ करण्याचा सल्ला देण्यात आला. वैमानिकांनी वाऱ्याची दिशा आणि दृश्यमानतेबाबत विचारणा केली असता, दृश्यमानता सुमारे 3,000 मीटर असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर विमानाने रनवे 11 वर अंतिम उतरणीची माहिती दिली, मात्र काही क्षणांतच धावपट्टी दिसत नसल्याचे सांगत ‘गो-अराउंड’ करण्याचा निर्णय घेतला.
पहिल्या प्रयत्नानंतर विमानाने पुन्हा अंतिम उतरणीचा प्रयत्न केला. एटीसीकडून धावपट्टी दिसत असल्याची खात्री विचारण्यात आली आणि ती मिळाल्यानंतर सकाळी 8.43 वाजता लँडिंगची परवानगी देण्यात आली. मात्र, याच टप्प्यावर एक गंभीर त्रुटी समोर आली. लँडिंग क्लीअरन्स मिळाल्यानंतर वैमानिकांकडून आवश्यक असलेला ‘रीडबॅक’म्हणजे परवानगी समजल्याची पुनःपुष्टी देण्यात आली नाही. पुढच्याच मिनिटाला, 8.44 वाजता, एटीसीने रनवे 11 च्या थ्रेशहोल्डजवळ आगीच्या ज्वाळा पाहिल्याचे मंत्रालयाच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
डीजीसीए (DGCA) मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमध्ये वैमानिकांचे शेवटचे शब्द ओह शिट… असे ऐकू आल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे बारामती विमानतळावरील ग्राउंड कंट्रोल हे शहरातील दोन खासगी विमान प्रशिक्षण संस्थांमधील रेडबर्ड एव्हिएशन आणि कार्व्हर एव्हिएशन पायलट कॅडेट्सकडून सांभाळले जाते. हाच या उड्डाणाचा जमिनीवरील संपर्क बिंदू होता. कॅप्टन सुमित कपूर यांचा 15 हजार तासांपेक्षा अधिक उड्डाणाचा अनुभव होता, तर सहवैमानिक शांभवी पाठक यांनी सुमारे 1,500 तासांचे उड्डाण केले होते.
Investigative agencies succeed in finding the plane’s black box, will be able to understand the exact cause of the Baramati crash
महत्वाच्या बातम्या
- Ajit Pawar Exit : “हा” निव्वळ विमान अपघात, राजकारण नको; संशयाचे मळभ भरलेल्या वातावरणात पवारांचे वक्तव्य
- अजितदादा म्हणे, भाजपची साथ सोडणार होते; ममता बॅनर्जींची संशय पेरणी किती खरी??, किती खोटी??
- “बघतो”, “सांगतो”, हे शब्द अजितदादांच्या डिक्शनरीत नव्हतेच, ते बोलायला रोखठोक आणि मनाने निर्मळ होते!!
- Uma Bharti : उमा भारती म्हणाल्या- शंकराचार्यांकडून पुरावे मागून प्रशासनाने मर्यादा ओलांडली