नवी दिल्ली : राष्ट्रीय महिला आयोगाने यांनी पुण्यातील एका विवाहित महिलेला पतीकडून कथितपणे अॅसिड टाकून अमानुष अत्याचार करण्यात आल्याच्या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली आहे.
या घटनेबाबत प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनंतर आयोगाने गंभीर भूमिका घेत तातडीने कारवाईचे निर्देश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पतीने विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून पत्नीच्या गुप्तांगावर फ्लोअर क्लिनिंग अॅसिड ओतल्याचा आरोप आहे. तसेच पीडित महिलेला अनेक दिवस घरात डांबून ठेवण्यात आले आणि तिला वैद्यकीय उपचारही नाकारण्यात आल्याचे समोर आले आहे.
The National Commission for Women has taken suo motu cognizance of deeply disturbing media reports regarding an alleged acid attack and extreme domestic cruelty against a woman in Pune, Maharashtra.
As reported, the accused husband allegedly poured floor-cleaning acid on the… pic.twitter.com/vTcCTho53f
— NCW (@NCWIndia) May 23, 2026
या प्रकरणाची गंभीर दखल घेत आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहून तातडीने कठोर आणि वेळबद्ध कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. आयोगाने सात दिवसांत सविस्तर ॲक्शन
टेकन रिपोर्ट (ATR) सादर करण्यास सांगितले आहे.
आयोगाने नोंदविण्यात आलेल्या एफआयआरची माहिती, भारतीय न्याय संहिता अंतर्गत लावण्यात आलेल्या कलमांची माहिती, तपासाची सद्यस्थिती, आरोपीची अटक व चौकशी, पीडितेची वैद्यकीय व फॉरेन्सिक तपासणी, तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या रासायनिक पदार्थाच्या जप्तीबाबत तपशील मागवला आहे.
याशिवाय पीडित महिला आणि तिच्या मुलांच्या सुरक्षेसाठी, संरक्षणासाठी आणि पुनर्वसनासाठी प्रशासनाने कोणती पावले उचलली याची माहितीही आयोगाने मागितली आहे. या प्रकरणाचा तपास अत्यंत संवेदनशीलतेने आणि तातडीने करण्यात यावा, असे निर्देशही आयोगाने दिले आहेत.
राष्ट्रीय महिला आयोगाने या घटनेचा तीव्र निषेध करत महिलांवरील अॅसिड हल्ले, घरगुती अत्याचार आणि हिंसाचार हे अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे असून अशा आरोपींवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे, असे स्पष्ट केले आहे.
National Commission for Women Takes Suo Motu Cognisance of Acid Attack on Wife’s Private Parts, Directs Strict Police action
महत्वाच्या बातम्या
- High Court : जनावरांच्या कत्तल निर्बंधांवर स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार
- Rohit Pawar : “भाजपसोबत जाणार नाही”; रोहित पवारांच्या विधानाने राष्ट्रवादीत नव्या चर्चांना उधाण
- ‘नीट’चा पेपर कसा फोडला, ते ही पुरावा न सोडता; चौकशीसाठी पोलिसांनी गाठलं मांढरेंचं कॉलेज! तपासात काय सापडलं पाहा!
- शेतकऱ्यांना कर्जवाटप वाढवा, सीबीलमुळे कुणालाही रोखू नका; मुख्यमंत्री फडणवीसांचे बँकांना निर्देश
