विशेष प्रतिनिधी
पुणे: मावळ तालुक्यात सध्या नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांना मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळणार असल्याची चर्चा रंगली आहे.माहितीनुसार, समाज कल्याण विभागाची सूत्रे त्यांच्याकडे सोपवली जाऊ शकतात.शेळकेंना मंत्रिपद मिळाल्यास मावळ तालुक्याला तिसऱ्यांदा ‘ लाल दिवा ‘ मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
मावळ तालुक्याचा राजकारणात मागील काही वर्षात बदल झाले आहेत. भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जरा मावळ मतदारसंघ आज अनेक पक्षांच्या संघर्षाचे केंद्र बनला आहे. 25 वर्षांपूर्वी भाजपने काँग्रेस मधील रूपलेखा ढोरे यांना उमेदवारी देत तालुक्यात नवे राजकीय समीकरण तयार केले. पुढे भाजपने संघटनात्मक ताकद वाढवत मावळमध्ये आपले अस्तित्व निर्माण केले.
पुढील काळात भाजपचे नेते बाळा भेगडे यांनी तालुक्यात नेतृत्व उभे केले. बाळा भेगडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपची ताकद वाढली आणि त्यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळाले. मंत्रीपदाच्या माध्यमातून मावळ तालुक्याला राज्याचा राजकारणात विशेष ओळख मिळाली होती. त्या अगोदर मदन बाफना यांनी देखील मंत्री पद भूषवत मावळच्या राजकारणात आपला मोठा ठसा उमटवला होता.
दरम्यान काही दिवसांपूर्वी सुनील शेळके यांच्या नावाची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी देखील चर्चा सुरू होती. मात्र उपाध्यक्षपदासाठी सुनील शेळके यांनी कोणताही रस दाखवला नव्हता. त्यानंतर आता थेट मंत्रिमंडळात सुनील शेळके यांची वर्णी लागणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे.
मावळ तालुक्यातील विकास कामे, प्रश्न आक्रमक भूमिका आणि संघटनात्मक संपर्क त्यामुळे शेळके यांनी गेल्या गाईवर सात स्वतःची राजकीय ओळख निर्माण केली आहे.त्यामुळे शेळके ना मंत्रिपद मिळाल्यास मावळ तालुक्याला तिसऱ्यांदा ‘ लाल दिवा ‘ मिळणार असल्याची चर्चा सध्या मावळात सुरू आहे.
New equation in Maval politics; Will Sunil Shelke join the cabinet?
महत्वाच्या बातम्या
- High Court : जनावरांच्या कत्तल निर्बंधांवर स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार
- Rohit Pawar : “भाजपसोबत जाणार नाही”; रोहित पवारांच्या विधानाने राष्ट्रवादीत नव्या चर्चांना उधाण
- ‘नीट’चा पेपर कसा फोडला, ते ही पुरावा न सोडता; चौकशीसाठी पोलिसांनी गाठलं मांढरेंचं कॉलेज! तपासात काय सापडलं पाहा!
- शेतकऱ्यांना कर्जवाटप वाढवा, सीबीलमुळे कुणालाही रोखू नका; मुख्यमंत्री फडणवीसांचे बँकांना निर्देश