NCP : निधी वाटपावरून महायुतीत ठिणगी , राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नगरसेवक आक्रमक

विशेष प्रतिनिधी

पुणे : NCP पुणे महानगरपालिकेतील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नगरसेवकांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन भाजप नगरसेवकांवर गंभीर आरोप केले आहेत.NCP

पुण्यातील बारामती हॉस्टेल येथे पार पडलेल्या बैठकीत नगरसेवकांनी विकास निधीच्या वाटपात दुजाभाव होत असल्याचा आरोप करत आपली नाराजी थेट मांडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी पुणे दौºयावर असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते, आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य तसेच नगरपालिका प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत भाजपच्या माजी नगरसेवक व नेत्यांकडून मनमानी कारभार होत असल्याचा आरोप केला.NCP



या बैठकीत अनेक नगरसेवकांनी महापालिकेत सत्ताधारी भाजपकडून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना डावलले जात असल्याचा तसेच त्यांच्या प्रभागांमध्ये विकास निधी उपलब्ध करून दिला जात नसल्याचा आरोपही करण्यात आला. निधीअभावी अनेक विकासकामे ठप्प झाली असून नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले. या पार्श्वभूमीवर नगरसेवकांनी पुणे महापालिकेच्या कारभारात थेट लक्ष घालण्याची विनंती सुनेत्रा पवार यांना केली. तसेच निधी वाटपातील वादावर तात्काळ तोडगा काढण्याची मागणीही करण्यात आली.

दरम्यान, नगरसेवकांच्या सर्व तक्रारी ऐकून घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.

Spark within Mahayuti over fund allocation; NCP (Ajit Pawar faction) corporators turn aggressive

महत्वाच्या बातम्या