विशेष प्रतिनिधी
नागपूर : Sushma Andhare ईव्हीएम हा लोकशाहीला लागलेला कर्करोग असून या विरोधात जन आंदोलनाची धग देशभर पसरविण्याची गरज आहे, असे आगलावे आवाहन शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केले आहे.Sushma Andhare
नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भगवान नगर येथील पटांगणातील ईव्हीएमविरोधी महारॅलीत महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या प्रा. सुषमा अंधारे, काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड, दिल्ली येथील ईव्हीएमविरोधी आंदोलन देशभरात पोचविणारे ॲड. मेहमूद प्राचा, माजी आमदार अशोक धवड आदी उपस्थित होते.
अंधारे म्हणाल्या, नोटबंदीच्या काळात हजारो कोटींच्या नोटा मोजणाऱ्यांना पाच वर्षांतून एकदाच केवळ ४० कोटी मतपत्रिका मोजाव्या लागतील. विधानसभा निवडणुकीपूर्वी मतपत्रिकेवर झालेल्या सिनेटच्या सर्व निवडणुका महाविकास आघाडीने जिंकल्या. विधानसभा निवडणुकीत पोस्टल मतदान मतपत्रिकेवर झाले असून त्यातही महाविकास आघाडी पुढे होती. मात्र ईव्हीएममधून झालेले मतदान ‘एव्हरी व्होट टू मोदी’ असे असून महाराष्ट्रात ईव्हीएम सरकार सत्तेवर आले.
भाजप सरकार प्रस्थापित व्हावे यासाठी दिल्लीत जंतरमंतरवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलन केले होते, आता ईव्हीएमद्वारे निवडून आलेल्या भाजपच्या केंद्र तसेच राज्य सरकारचा बुरखा फाडण्यासाठी पुन्हा एकदा ‘ईव्हीएम’च्याविरोधात राष्ट्रव्यापी आंदोलनाची हाक नागपुरातून देण्याची गरज आहे, असा सूर ‘ईव्हीएम अगेन्’स्टतर्फे उपराजधानीत आयोजित ‘ईव्हीएम विरोधी महारॅली’तून व्यक्त करण्यात आला.
सोमवारी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी ईव्हीएमविरोधात कांगावा केला. विधान परिषेदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार घोषणाबाजी केली. शिवाय बीडमध्ये हत्या झालेले सरपंच संतोष देशमुख यांचेही फोटो विरोधकांनी झळकावले आहेत.
Sushma Andhare appeals to spread the mass movement against EVM across the country
महत्वाच्या बातम्या
- Bhujbal भुजबळ समर्थकांचे ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन
- Amit Shah : नक्षलवाद सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील तरुणांची अमित शहा यांनी घेतली भेट
- Mani Shankar Aiyar मणिशंकर अय्यर म्हणाले- गांधी परिवाराने माझे करिअर उद्ध्वस्त केले, सोनिया-राहुल 10 वर्षांत एकदा भेटले
- भाजपकडून होणार हे मंत्री, सर्व समाज घटकांना आणि राज्यातील विभागांना प्रतिनिधित्व