“युवा शक्तीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही”; कॉक्रोच जनता पार्टीला अण्णा हजारेंचा पाठिंबा

विशेष प्रतिनिधी

पुणे : देशभरात सध्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’वरून दोन गट पडल्याचे चित्र असून, सोशल मीडियावर दावे-प्रतिदावे आणि आरोप-प्रत्यारोपांची जोरदार चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी तरुणांच्या भूमिकेला महत्त्व पाठिंबा दिला आहे.
पत्रकारांनी ‘कॉक्रोच जनता पार्टी’बाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना अण्णा हजारे म्हणाले की, “झुरळ असे नाव असले तरी देशातील मोठ्या प्रमाणात तरुण त्या पक्षाच्या पाठीशी उभे राहत आहेत. मग त्या नावामागचा उद्देश काय आहे, हे समजून घेतले पाहिजे. नाव योग्य वाटत नसेल, तरी युवकांचा पाठिंबा ही मोठी बाब आहे.”
ते पुढे म्हणाले, “युवा शक्ती ही राष्ट्र शक्ती असते. तरुणांच्या भावना आणि लोकमत याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शासनाने त्यांच्या मतांचा अव्हेर न करता त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे.”



दरम्यान, ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या समर्थकांसाठी आणखी एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. पक्षाचे संस्थापक अभिजित दीपकी यांनी एक्सवरील पोस्टद्वारे पक्षाचे इन्स्टाग्राम खाते पुन्हा सुरू झाल्याची माहिती दिली. “आम्ही इन्स्टाग्रामवर परत आलो आहोत. आमचे खाते परत मिळाले आहे,” असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वीच ‘सीजेपी’चे अधिकृत एक्स खाते भारतात ब्लॉक करण्यात आले होते. त्यानंतर सोशल मीडियावर या पक्षाबाबत मोठी चर्चा रंगली होती.

“Youth power cannot be ignored”; Anna Hazare backs Cockroach Janata Party

महत्वाच्या बातम्या