filming devotees : भक्तांच्या खासगी आयुष्याचे चित्रीकरण करणाऱ्या भोंदू बाबाला अटक

filming devotees : भक्तांच्या खासगी आयुष्याचे चित्रीकरण करणाऱ्या भोंदू बाबाला अटक

filming devotees

विशेष प्रतिनिधी

पुणे: भक्तांच्या मोबाईलमध्ये गुपचूप अँप डाउनलोड करून मोबाईलचा ऍक्सेस घेत त्यांचे खाजगी क्षण पाहणाऱ्या आणि त्यांचे चित्रीकरण करणाऱ्या एका भोंदू बाबाला बावधन पोलिसांनी अटक केली आहे. मृत्यूची भीती दाखवीत तरुण भक्ताना वेश्या किंवा प्रेयसीशी शारिरिक संबंध प्रस्थापित करण्यास प्रवृत्त करून तो त्यांच्या हालचाली मोबाईल कॅमेऱ्याद्वारे टिपत होता. आपला मोबाईल सारखा गरम का होत आहे हे तपासण्यासाठी बाबाच्या एका भक्ताने मोबाईलमध्ये तज्ञ् असणाऱ्या आपल्या मित्राला तो दाखविला. आणि त्या तज्ञ् असणाऱ्या मित्राच्या बाबाची ही गोष्ट लक्षात येणास वेळ लागलं नाही आणि बाबाच्या कृत्याचा सर्व उलगडा झाला.  filming devotees

प्रसाद उर्फ भीमराव तामदार (वय २९ रा. सुसगाव, मुळशी) असे अटक करण्यात आलेल्या बाबाचे नाव आहे. याप्रकरणी एका ३९ वर्षीय भक्ताने बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित बाबा बावधन परिसरात श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या आडून आपली दुकानदारी चावट होता. आपल्याला दिव्यशक्तीची आत्मभूती प्राप्त झाली आहे असा दावा करत तो भक्ताना तुमचा मृत्यू चाट ते पाच महिन्यात अटळ आहे असे भागवत सांगून मानसिकदृष्ट्या कमकुवत करत होता.

यानंतर मंत्र जप करण्याच्या बहाण्याने तो भटकणं एकांत ठिकाणी बसवून त्यांचा मोईबेल हातात घेत, पासवर्ड विचारून मोबीएलमध्ये गुपचूप एअर ड्राईड कीड हे हिडन अँप डाउनलोड करून ठेवत असे. हे अँप बॅकराऊंड मध्ये कार्यरत राहून बाबाला संबंधित भटांचा कॅमेरा, आवाज, लोकेशन यावर थेट नियंत्रण मिळवून देत होते. या अँपच्या सहाय्याने बाबा भक्तांना फोन करून त्यांनी कोणते कपडे घातले आहेत, सध्या कुठे आहेत, त्यांनी दिवसभरात काय काय केले याबाबत माहिती सांगत होता. त्यामुळे भटांचा त्यांच्यावरील विश्वास अधिक बळकट झाला होता.

या प्रकारचा सर्वात गंभीर मुद्दा म्हणजे काही तरुण भटांनी मृत्यूपासून सुटका करून घेण्यासाठी उपाय विचारल्यावर बाबाने त्यांना प्रेयसी किंवा वेश्या असलेल्या तरुणीशी शारीरिक सम्बन्ध प्रस्थापित करा असा सल्ला दिला. विशेष म्हणजे शारीरिक सम्बन्ध सुरु असताना मोबाईल दिशादर्शक सुरु करून तो विशिष्ट कोनातून ठेवण्यास सांगत असे. त्याद्वारे कॅमेऱ्याच्या माध्यमातून बाबा त्यांचे खासगी क्षण पाहत आणि त्यांचे चित्रीकरण करत होता. दरम्यान एका तरुण भक्ताचा मोबाईल सतत गरम होऊन लागल्याने त्याने तो तपासण्यासाठी आपल्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या मित्राला दिला. त्या मित्राने लॅपटॉपच्या साहाय्याने मोबाईल तपासला असता त्यात एक संशयास्पद हिडन अँप सापडले. त्याच्या मदतीने मोबाईल बाहेरून कोणी तरी ऑपरेट करत असल्याचे स्पष्ट झाले. तेव्हा संबंधित तरुणाला आठवले की आपण मोबाईल केवळ त्या बाबाच्याच हातात दिला होता. त्यानंतर त्या तरुणाने इतर काही भक्तांशी संपर्क साधला असता त्यांच्याही मोबाईल मध्ये तेच अँप असल्याचे निष्पन्न झाले.

आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर सर्व भक्तांनी एकत्र येऊन बाबाला जाब विचारला. त्यावेळी बाबाची बोबडी वळली आणि त्याने तक्रार न करण्याची विनंती केली. मात्र एका तरुण भक्ताने थेट ११२ नंबरवर कॉल करून याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन बाबाला ताब्यात घेतले. त्यानंतर शुक्रवारी (दिनांक २७) बावधन पोलीस ठाण्यात भक्तांची मोठी गर्दी झाली होती. अनेक भक्तांनी आपल्यावरही अशाच प्रकारे प्रयोग झाल्याचे पोलिसांना सांगतिले आहे. दरम्यान सायबर तज्ज्ञांच्या मदतीने आरोपी बाबाच्या मोबाईल आणि वापरलेल्या अँप ची तपासणी करण्यात आली. त्यावेळी भक्तांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य आढळले. त्यानुसार बाबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भक्तांचे चित्रीकरण कोठे साठवले जात होते याचा शोध घेण्यासाठी डिजिटल फॉरेन्सिक तपास सुरु करण्यात आला आहे. या प्रकरणात आयटी ऍक्ट आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यातील विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलं आहे. तपास बावधन पोलीस करत आहेत. filming devotees

Impostor arrested for filming devotees’ private lives

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023