विशेष प्रतिनिधी
पिंपरी : beaten in theater चित्रपटगृहात कॉन्ज्युरिंग हा सिनेमा पाहताना ‘स्टोरी आधी सांगू नका’ असे सांगितल्यामुळे एका 29 वर्षीय तरुणाला बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्या तक्रारीवरून चिंचवड पोलीस ठाण्यात एका दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. beaten in theater
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुण आपल्या पत्नी आणि बहिणीसोबत सिनेमा पाहत होता. त्याचवेळी त्याच्या मागील सीटवर बसलेले एक दाम्पत्य सिनेमाची स्टोरी सांगत होते आणि गोंधळ घालत होते. त्यामुळे तरुणाने त्यांना शांत बसण्याची आणि सिनेमाची कथा आधी सांगू नये अशी विनंती केली. beaten in theater
तरुणाच्या या विनंतीमुळे संतापलेल्या आरोपीने लगेचच त्याची कॉलर पकडून त्याला मारहाण करायला सुरुवात केली. आरोपीने त्याला लाथा-बुक्क्यांनी मारून जमिनीवर पाडले. यात तरुणाच्या डाव्या हाताला, चेहऱ्याला आणि पोटाला गंभीर दुखापत झाली. भांडण सोडवण्यासाठी त्याची पत्नी पुढे आल्यावर आरोपी आणि त्याच्या पत्नीने तिलाही मारहाण केली आणि दोघांना शिवीगाळ केली. beaten in theater
या घटनेनंतर पीडित तरुणाने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अकिब जावेद निसार पटेल आणि त्याच्या पत्नीवर भारतीय न्याय संहिता ११७, ११५ आणि ३५२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. beaten in theater
Young man brutally beaten up in theater for telling him not to tell the story first
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा