विशेष प्रतिनिधी
मुंबई : इस्त्रायली गुप्तहेराच्या कथित स्टिंग ऑपरेशनवर कॉन्स्पीरसी थेअरी मांडत भारताचा पंतप्रधान बदलून त्या जागी एखादा ‘मराठी माणूस’ पंतप्रधानपदी विराजमान होऊ शकतो,” असा दावा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. तो फोल ठरला आहे. Prithviraj Chavan
जगभरात अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या एपस्टीन फाईल्स उघड झाल्या आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांनी भारतीय राजकारणात 19 डिसेंबरला मोठा भूकंप होणार असल्याचे भाकित वर्तवले होते. देशाला लवकरच मराठी पंतप्रधान मिळेल, असेही त्यांनी म्हटले होते. यामुळे देशात कोणता राजकीय भूकंप होणार, नेमकं काय घडणार आहे, याची सर्वत्र चर्चा होती. पृथ्वीराज चव्हाणांनी केलेल्या दाव्यानुसार 19 डिसेंबरला कोणतीही खळबळ उडाली नाही. एपस्टीन फाईल्समधून भारताच्या दृष्टीने काहीही धक्कादायक बाहेर आले नाही. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्याबद्दल आता तो फसला का, अशी चर्चा होत आहे.
अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्हजमधील डेमोक्रॅट्सकडून जेफ्री एपस्टीनच्या संग्रहातील काही नवीन फोटो, इमेल्स जाहीर करण्यात आले. यामध्ये मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स, गुगलचे सहसंस्थापक सर्गेई ब्रिन, विचारवंत नोम चॉम्स्की आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे माजी सल्लागार स्टीव्ह बॅनन यांचे फोटो समोर आले आहेत. हे फोटो उघड करुन एपस्टीनचे जगभरातील प्रभावशाली लोकांसोबत कसे संबंध होते हे दाखवण्याचा उद्देश आहे. मात्र या फोटोंमधून कोणावरही कोणताही गंभीर आरोप सिद्ध होत नाही. पृथ्वीराज चव्हाण आणि सुब्रम्हण्यम स्वामी यांनी केलेल्या दाव्यानुसार काहीही धक्कादायक समोर आलेले नाही.
अमेरिकेच्या प्रतिनिधी सभागृहातील डेमोक्रॅट्सनी दोषी ठरलेल्या लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीनच्या इस्टेटमधील 68 नवीन फोटो प्रसिद्ध केले आहेत. 2019 मध्ये एपस्टीनचा तुरुंगात मृत्यू झाला त्यापूर्वी हाऊस ओव्हरसाईट कमिटीने जप्त केलेल्या 95 हजार फोटोंमधून हे फोटो मिळवल्याची माहिती आहे. यामध्ये एपस्टीन अनेक प्रभावशाली आणि श्रीमंत लोकांसोबत विविध कार्यक्रमांमध्ये दिसत आहे. अनेक फोटोमध्ये काही अत्यंत धक्कादायक बाबी देखील आहेत. व्लादिमीर नाबोकोव्ह लिखित “लोलिता” या कादंबरीतील काही ओळी महिलांच्या शरीराच्या विविध भागांवर लिहिलेले फोटो यामध्ये आहेत. तसेच रशिया, युक्रेन, दक्षिण आफ्रिका आणि लिथुआनियासह अनेक देशांचे पासपोर्ट, व्हिसा आणि ओळखपत्रे देखील प्रसिद्ध करण्यात आली आहेत.
एपस्टीन फाईल म्हणजे जेफ्री एपस्टीन आणि त्याच्या कथित सेक्स ट्रॅफिकिंग जाळ्यामधील सरकारी कागदपत्र, फोटो, ईमेल्स यांचा संच आहे. यामध्ये न्यायालयीन नोंदी, साक्षीदारांचे जबाब, विमान प्रवासासंबंधीची आणि आर्थिक देवाण घेवाणी संबंधीची माहिती आहे.
जेफ्री एपस्टीन हा अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणातील मोठा गुन्हेगार होता. एका गुप्तहेर संघटनेच्या मदतीने मोठा झालेला आणि नंतर फायनान्स कंपनीच्या माध्यमातून आर्थिक सबळ झालेल्या एपस्टीने प्रचंड संपत्ती मिळवली. अमेरिकेसह अनेक देशांत त्याची मालमत्ता आहे, त्याने एक बेट देखील विकत घेतले होते. जगातील अनेक बडे नेते, उद्योगपती, सेलिब्रिटी यांच्यासोबत त्याची घनिष्ट मैत्री होती. या लोकांना तो अल्पवयीन मुली पुरवायचा आणि त्यांचे फोटो काढणे, व्हिडीओ शूट करून या नेत्यांना ब्लॅकमेल करण्याचा धंदा करायचा. त्याचे हे अल्पवयीन मुलींचे सेस्क स्कँडल इतक्या उच्च स्तरावर होते की सामान्य माणसाचा याच्याशी काही संबंध नव्हता. किंबहुना असं काही चालतं याची सामान्य लोकांना माहितीही नसायची.
पृथ्वीराज चव्हाण 19 डिसेंबरबाबत केलेल्या विधानाबाबत म्हणाले होते की, 19 डिसेंबरला अमेरिकेच्या संसदेमध्ये किंवा संसदबाहेर काही महत्त्वाचे गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे. त्या कागदपत्रांमधून एपस्टाईन प्रकरणाशी संबंधित भारतासंदर्भातील माहिती समोर येणार असून, विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा संदर्भात धक्कादायक माहिती असण्याची चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू आहे. ही माहिती अत्यंत स्फोटक असून अंधभक्तांना कायमच्या कोमात पाठवणारी असेल.या गौप्यस्फोटानंतर भाजपाची मोठी फजिती होणार असून कितीही प्रयत्न केले तरी भाजपा सत्तेत टिकू शकणार नाही, असे विश्लेषण समोर आले असल्याचेही ते म्हणाले होते.
Prithviraj Chavan’s conspiracy theory about Epstein files is false
महत्वाच्या बातम्या
- सातारा ड्रग्स कारखाना प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा राजीनामा घ्या, हर्षवर्धन सपकाळ
- संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना हटविण्याची मागणी
- बांगलादेशात युवा नेते शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर प्रचंड असंतोष, देशभर आंदोलन; ढाकामध्ये जाळपोळ
- विधानसभा निवडणुकीत आघाडीचा टांगा पलटला, आता महापालिकेत घोडेही फरार, एकनाथ शिंदेंचा टोला