विशेष प्रतिनिधी
मुंबई : धनंजय मुंडे हे एक आक्रमक व अभ्यासू ओबीसी नेते आहेत. त्यांना जाणिवपूर्वक मंत्रिपद मिळू नये व त्यांचे राजकीय कारकिर्द उद्ध्वस्त व्हावी यासाठी सुप्रिया सुळेंनी त्यांच्याविरोधात मीडिया ट्रायल चालवली. सुप्रिया यांना मुंडेंचा राजीनामा हवा होताच. पण त्यांना तुरुंगात डांबण्याचीही त्यांची इच्छा होती, असा आरोप ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केला आहे . Dhananjay Munde
सुप्रिया सुळे यांचे बंधू म्हणजे अजित पवार यांनी 70 हजार कोटींचा घोटाळा केला. तेव्हा त्या गप्प का गप्प होत्या? त्यांनी स्वतःच्या भावाविरोधात आंदोलन का केले नाही? पार्थ पवार यांनी महार वतनाची जमीन घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही सुप्रिया सुळेंनी त्यांना क्लीनचिट दिली. ओबीसी नेते छगन भुजबळ यांना तुरुंगात पाठवण्यामागे शरद पवार व सुप्रिया सुळे यांचेच षडयंत्र होते. पवार कुटुंब जातीवादी आहे. त्यांना दलित, मुस्लिम, ओबीसी व आदिवासी समाज चालत नाही. सुप्रिया सुळे यांचा पक्ष आता संपला आहे. ओबीसी समाजाने त्यांना त्यांची जागा दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी काळात त्यांचा पक्ष होत्याचा नव्हता होईल, असा हल्लाबोल नवनाथ वाघमारे यांनी केला.
विधानसभा निवडणुकीत ओबीसींचे लोकप्रतिनिधी वाढल्याचे सांगताना वाघमारे म्हणाले, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत ओबीसींचे 39 आमदार वाढले. तर मराठा समाजाचे 18 कमी झाले. आगामी काळात आम्ही ओबीसींचे 100 आमदार वाढवू व मराठ्यांचे तेवढेच कमी करू. आमदार रोहित पवार व मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत जाणाऱ्यांना त्यांची जागा दाखवली जाईल.
माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यामुळे महायुती सरकारमधील एक मंत्रिपद रिक्त झाले आहे. या रिक्त जागेवर आपली वर्णी लागावी यासाठी मुंडे यांनी दिल्लीतून फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे. पण सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्री केल्यास आपण बीडमध्ये जाऊन उपोषणाला बसू असा इशारा दिल्यामुळे वातावरण तापले आहे
Dhananjay Munde alleges media trial by Supriya Sule to destroy Dhananjay Munde’s political career
महत्वाच्या बातम्या
- सातारा ड्रग्स कारखाना प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा राजीनामा घ्या, हर्षवर्धन सपकाळ
- संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना हटविण्याची मागणी
- बांगलादेशात युवा नेते शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर प्रचंड असंतोष, देशभर आंदोलन; ढाकामध्ये जाळपोळ
- विधानसभा निवडणुकीत आघाडीचा टांगा पलटला, आता महापालिकेत घोडेही फरार, एकनाथ शिंदेंचा टोला