विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर :Yadravkar Group कोल्हापूर जिल्ह्यात अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या जयसिंगपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अखेर यड्रावकर गटाने (Yadravkar Group) आपली सत्ता कायम राखली आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत संजय पाटील – यड्रावकर यांनी निर्णायक विजय मिळवत विरोधकांना जोरदार धक्का दिला.
या निवडणुकीत आमदार राजेंद्र पाटील – यड्रावकर यांनी शाहू आघाडीच्या माध्यमातून मैदानात उतरत संपूर्ण ताकद पणाला लावली होती. त्याचा परिणाम थेट निकालात दिसून आला. शाहू आघाडीने नगरपालिकेतील एकूण 25 पैकी तब्बल 20 जागांवर दणदणीत विजय मिळवला, तर विरोधी गटाला केवळ 5 जागांवर समाधान मानावे लागले. Yadravkar Group
नगराध्यक्षपदाच्या थेट लढतीत आमदार राजेंद्र पाटील – यड्रावकर यांचे बंधू संजय पाटील – यड्रावकर हे उमेदवार होते. त्यांच्या विरोधात माजी खासदार राजू शेट्टी, गणपतराव पाटील, आमदार सतेज पाटील तसेच महाडिक गट यांनी एकत्र येत जोरदार युती केली होती. विरोधकांनी सर्व शक्ती एकवटूनही यड्रावकर गटाची घोडदौड रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र तो निष्फळ ठरला.
या निकालामुळे जयसिंगपूर नगरपालिकेत यड्रावकर कुटुंबाची राजकीय पकड पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. विकासकामांची सातत्यपूर्ण अंमलबजावणी, स्थानिक प्रश्नांवर थेट संपर्क आणि मजबूत संघटनात्मक बांधणी ही यड्रावकर गटाच्या विजयाची प्रमुख कारणे मानली जात आहेत.
जिल्ह्यातील आगामी राजकीय समीकरणांवर या निकालाचा मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Yadravkar Group Retains Grip on Jaysingpur Municipal Council, Shahu Aghadi Wins 20 of 25 Seats
महत्वाच्या बातम्या
- सातारा ड्रग्स कारखाना प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा राजीनामा घ्या, हर्षवर्धन सपकाळ
- संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना हटविण्याची मागणी
- बांगलादेशात युवा नेते शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर प्रचंड असंतोष, देशभर आंदोलन; ढाकामध्ये जाळपोळ
- विधानसभा निवडणुकीत आघाडीचा टांगा पलटला, आता महापालिकेत घोडेही फरार, एकनाथ शिंदेंचा टोला