विशेष प्रतिनिधी
पुणे : Jejuri Horror जेजुरीत मतमोजणीचा उत्साह संपताच विजयी जल्लोषाला शोकाची किनार लागली. खंडोबा गडाच्या पहिल्या पायरीवर भंडारा अर्पण करत असताना अचानक भीषण भडका उडाल्याने किमान १६ जण गंभीर भाजल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत नुकत्याच निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नगरसेविकांसह अनेक महिला व तरुण गंभीर जखमी झाले आहेत.Jejuri Horror
घटनेनंतर खंडोबा गड परिसरात काही क्षणांतच प्रचंड गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. भाविक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असताना भंडाऱ्याने अचानक पेट घेतला आणि जोरदार आवाजासह भडका उडाला. क्षणार्धात आजूबाजूचे लोक होरपळले. स्फोटासारखा आवाज आणि आगीचे लोळ पाहून अनेकांनी जीव वाचवण्यासाठी धावपळ केली.Jejuri Horror
माहितीनुसार, मल्हार नाट्यगृहात मतमोजणी पूर्ण होऊन निकाल जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयी उमेदवार, कार्यकर्ते आणि समर्थक खंडोबा गडावर दर्शनासाठी गेले होते. खंडोबाच्या पहिल्या पायरीवर मोठ्या प्रमाणावर भंडारा उधळण्यात येत होता. यावेळी वापरण्यात आलेल्या भंडाऱ्यात ज्वलनशील घटक असल्याने अचानक आग भडकली आणि मोठा भडका उडाला.
या दुर्घटनेत भाजलेल्या जखमींना तातडीने जेजुरीतील खासगी व शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यात हलवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. डॉक्टरांकडून जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. परिसर सुरक्षित करून पुढील अनर्थ टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या. भंडाऱ्यात नेमका कोणता पदार्थ वापरण्यात आला होता, सुरक्षा नियमांचे पालन झाले होते का, याबाबत पोलीस तपास करत आहेत.
दरम्यान, धार्मिक उत्सव आणि विजयी मिरवणुकीदरम्यान अशा प्रकारच्या ज्वलनशील पदार्थांच्या वापरावर नियंत्रण ठेवण्याची मागणी नागरिकांकडून होत असून, या दुर्घटनेमुळे संपूर्ण जेजुरी शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Jejuri Horror: Bhandara Explosion on Khandoba Temple Steps, 16 Including Councillors Seriously Burnt
महत्वाच्या बातम्या
- नगरपालिका निवडणुकीतील सत्ताधारी पक्षांचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने, हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
- पुणे जिल्ह्यात अजित पवारच ‘दादा!’ १७ पैकी १० नगराध्यक्षपदावर राष्ट्रवादीची बाजी
- मुश्रीफ – घाटगे जोडीची कागलमध्ये कमाल, 23 पैकी 23 जागा जिंकत एकहाती सत्ता
- Girish Mahajan त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेत मंत्री गिरीश महाजन यांना धक्का, शिर्डीत विखे पाटलांची सत्ता